मुंबई - गोरखपूरमधील डॉक्टर कफील खान यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश टास्क फोर्सने डॉ. कफील खान यांना मुंबई येथून अटक केली आहे. गोरखपूरमधील रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूनंतर कफील खान हे चर्चेत आले होते. दरम्यान, त्यांच्यावर आरोप करत त्यांना बीआरडी मेडिकल कॉलेजमधून निलंबितही करण्यात आले होते. दरम्यान, 12 डिसेंबर 2019 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप कफील खान यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2017 मध्ये बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालमृत्यूप्रकरणी डॉ. कफील खान यांना निलंबित करण्यात आले होते. डॉ. कफील खान यांच्यावर आयपीसीचे कलम 153-अ अंतर्गत सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ''मोटाभाई सर्वांना हिंदू किंवा मुस्लिम बनायला शिकत आहेत. मात्र मनुष्य बनणे शिकवत नाही, अला टोला कफील खान यांनी नाव न घेता लगावला होता,'' असे कफील खानविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. तसेच जेव्हापासून आरएसएसचा उदय झाला आहे. तेव्हापासून माझा घटनेवर विश्वास राहिलेला नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे मुस्लिम दुय्यम नागरिक बनले आहेत. आता एनआरसी लागू झाल्यानंतर लोकांना अशाच प्रकारे त्रास दिला जाईल,'' अशी भीती कफील खान यांनी व्यक्त केली.
भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा मोठा कट?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचं 'हे' कारस्थान; शिवसेनेने केली अमित शहांची पाठराखण
केरळमध्ये संघर्ष आणखी तीव्र, असहमती दर्शवून राज्यपालांनी केला सीएएविरोधाचा उल्लेख 'ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला लढावे लागेल. दाढी ठेवणारे लोक दहशतवादी असतात, अशी शिकवण आरएसएसच्या शाळांमधून देण्यात येते. आता सीएए लागू करून भारत हा एक देश नसल्याचे सिद्ध केले आहे, असा आरोपही डॉ. कफील खान यांनी केला.