शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
2
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
3
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
4
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
5
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
6
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
7
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
8
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
9
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
10
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
11
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
12
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
13
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
14
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
15
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
16
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
17
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
18
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
19
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
20
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार

गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या पद्मश्री डॉ. अग्रवाल यांचं कोरोनानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 9:01 AM

कोरोनाच्या संकटात देशाने अनेक दिग्गजांना गमावलं आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत आप्तजनांना आणि जवळच्या प्रिय व्यक्तांना अनेकांनी गमावलय.

ठळक मुद्देडॉ. अग्रवाल आपल्या व्यवसायाने प्रसिद्ध होतेच, पण गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देणे आणि दिलदारपणामुळेही ते लोकांचे आवडते होते.

मुंबई - इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि हर्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. के.के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समधील ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 

कोरोनाच्या संकटात देशाने अनेक दिग्गजांना गमावलं आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत आप्तजनांना आणि जवळच्या प्रिय व्यक्तांना अनेकांनी गमावलय. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांचे निधन झाले. आता, डॉ. के.के अग्रवाल यांचीही कोरोनाविरुद्धची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. अग्रवाल यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनच यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे अग्रवाल यांनी दोन महिन्यांपूर्वीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. पण, गेल्याच महिन्यात त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. सन 2010 मध्ये अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अग्रवाल आपल्या व्यवसायाने प्रसिद्ध होतेच, पण गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देणे आणि दिलदारपणामुळेही ते लोकांचे आवडते होते. कोरोना काळातही डॉक्टरांच्या पाठिशी ते खंबीरपणे उभे राहिले. पण, याच कोरोनाच्या संक्रमणामुळे त्यांचे निधन झाले.

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNew Delhiनवी दिल्ली