शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

डॉ.प्रशांत चौधरी कार अपघातात ठार

By admin | Published: April 18, 2016 12:47 AM

जळगाव: येथील प्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ.प्रशांत चौधरी (वय २८ रा. बी.जे.मार्केटजवळ जळगाव) हे कार अपघातात ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता नाशिक जवळील शिरवाडे वणी, पिंपळगाव येथे हा अपघात झाला. त्यानंतर त्यांना नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

जळगाव: येथील प्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ.प्रशांत चौधरी (वय २८ रा. बी.जे.मार्केटजवळ जळगाव) हे कार अपघातात ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता नाशिक जवळील शिरवाडे वणी, पिंपळगाव येथे हा अपघात झाला. त्यानंतर त्यांना नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
जुने बी.जे.मार्केटसमोर डॉ.चौधरी यांची प्रशांत पॅथॉलॉजी आहे, तर पत्नी वंदना चौधरी (एम.डी.) या स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्याच इमारतीत त्यांचा दवाखाना आहे. वरच्या मजल्यावर चौधरी दाम्पत्य वास्तव्याला आहेत.मुलगा निनाद व मुलगी शान्मयी हे दोघं मुंबईत शिक्षण घेत आहेत. त्यांना सोडण्यासाठी डॉ.चौधरी, त्यांची पत्नी डॉ.वंदना चौधरी, आई शशिकला चौधरी व वडील डॉ.प्रल्हाद चौधरी आदी जण इनोव्हा कारने (एम.एच.१९ ए.ई.१११८) मुंबईला जात होते.
पुलावरुन पलटी झाली कार
शिरवाडे वणी पिंपळगाव येथे पुलावर विरुध्द दिशेेन कार त्यांच्या कारच्या दिशेने आली. या कारला वाचविताना डॉ.चौधरी यांनी त्यांची कार रस्त्याच्या कडेला नेली. त्यात टायर फुटल्याने उंच पुलावरुन कार थेट खाली कोसळली.यावेळी कारने चार ते पलटी घेतली.त्यामुळे डॉ.चौधरी यांच्या डोक्याला जबर मार बसला तर कारमधील आई, वडील, पत्नी, व मुले यांना किरकोळ लागले. या अपघातानंतर त्यांना तातडीने नाशिक येथील अत्याधुनिक खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी साडे आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
अमोदा ता.यावल हे त्यांचे मुळ गाव आहे. मोठे भाऊ मिलिंद चौधरी हे देखील जळगावातच वास्तव्याला आहेत. ते शेती करतात. मुलगी शान्मयी हीने नुकतीच मुंबईत बारावी सायन्सची परीक्षा दिली. मुलगा निनाद हा मुबंईतील वडाळा येथील विद्यालंकार अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष कॉम्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा रायफल शुटींगचा खेळाडू असून नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदक मिळविले होते. मुलाच्या कर्तबगारीवर डॉ.चौधरी प्रचंड खुश होते.