शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

By admin | Published: January 09, 2017 1:36 AM

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५७ मध्ये त्यांची या पदावर फेरनिवड झाली. हे पद १२ वर्षे भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. इतिहासातील सर्वात आदरणीय नेत्यांत त्यांचा समावेश होतो, असे म्हणणे गैर नाही. राजकीय वाद आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याच्या आजच्या काळात त्यांच्याकडून निश्चितपणे चांगला धडा घेऊ शकतो. ते आधी भारतीय आणि नंतर राजकारणी होते. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा ताफा कमी केला. त्यांच्याकडे केवळ एकच कर्मचारी होता. डॉ. प्रसाद सर्व कामे स्वत: करीत. त्यांनी तीन वर्षे तुरुंगवास सोसला. या काळात कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आपण तुरुंगात असल्यापेक्षा नातीच्या पायाला खरचटल्याची त्यांना अधिक काळजी वाटत होती. त्यांच्या एकाही नातवाला ते मोठे राजकीय नेते आहेत याची कल्पना नव्हती. त्यांच्या पत्नी राजवंशी देवी यांनी नातवांना ते तुमचे आजोबा आहेत एवढेच सांगितले होते. ते कुटुंबवत्सल होते. नातवे शाळेतून परतल्यानंतर ते त्यांच्यासोबत जेवण घेत.  राष्ट्रपती म्हणून निम्मेच वेतन स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा राष्ट्रपतींना दरमहा दहा हजार रुपये वेतन होते. राष्ट्रपती पदावर असल्यामुळे त्यांना अनेक भेटवस्तू देऊ केल्या जात; मात्र ते भेटवस्तू स्वीकारण्यास विनम्रपणे नकार देऊन त्या परत करीत. त्यांना भौतिक लाभात रस नव्हता. तथापि, भारत भेटीवर आलेल्या विविध परदेशी गणमान्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्याकडून मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा त्यांनी संग्रह केला. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते, तसेच कार खरेदी करण्याइतपत त्यांची ऐपत होती. त्यांनी  कार घेतलीही; परंतु कार घेण्याएवढे राष्ट्रपतींचे वेतन नसल्याकडे काही नेत्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी कार परत केली. राष्ट्रपती असताना आपल्या एकाही नातीच्या विवाहात त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. कुटुंबातील मुलींच्या लग्नात तिला साडी देण्याची परंपरा आहे; मात्र दुसऱ्या कोणीतरी ती घेऊन देण्याऐवजी किंवा नवी घेण्याऐवजी प्रसाद तिच्यासाठी स्वत: साडी विणत. कार्यकाळ संपत असताना त्यांनी आपले वेतन  आणखी २५ टक्क्यांनी कमी केले. दरमहा ते केवळ अडीच हजार रुपये घेत. निवृत्तीनंतर ते आजारी पडले तेव्हा शहरात राहून चांगले उपचार घेण्याऐवजी ते बिहारमधील सदाकत आश्रमात परतले.तुम्हाला येथे चांगले उपचार मिळतील, असे सांगितल्यानंतर ‘मै जहाँसे दिल्ली आया हू, वहीं फिर वापस जाऊंगा’, असे ते म्हणत.