ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दोन वर्षांपूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या डॉ. के रामामूर्ती यांची भारतीय सुरक्षा एजन्सींकडून सुटका करण्यात आली आहे.
डॉ. के रामामूर्ती यांचे इसिस या दहशतवादी संघटनेने दोन वर्षांपूर्वी लिबियामधून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची शनिवारी इसिसच्या जाळ्यातून भारतीय सुरक्षा एजन्सींकडून सुटका करण्यात आली. यावेळी डॉ. के रामामूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनएसए आणि सर्व अधिका-यांचे आभार मानले.
इसिसकडून मला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करण्यात येत नव्हती. मात्र, इसिसच्या दहशतवाद्यांवर उपचार करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. परंतू मी कोणावरही कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. तसेच, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात येत होती, असे डॉं. के रामामूर्ती यांनी यावेळी सांगितले.
Thankful to Prime Minister,NSA and other officials for the help. I will never forget: Dr.K Ramamurthy,Indian doctor freed from ISIS in Libya pic.twitter.com/tPQAvcjbxo— ANI (@ANI_news) February 26, 2017
They used to force me to get into operation theatres, but I never did any surgery or stitches:Dr K Ramamurthy,freed from ISIS in Libya— ANI (@ANI_news) February 26, 2017
ISIS did not do anything to me physically, but abused me verbally, they were educated youth well aware about India: Dr. K Ramamurthy— ANI (@ANI_news) February 26, 2017