नवी दिल्लीः टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या खासदारांना ते सदस्यता आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. त्यांनी आतापर्यंत सात वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. वीरेंद्र कुमार हे दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. मध्य प्रदेशातील टिकमगडचे खासदार वीरेंद्र कुमार हे सागर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी सागर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ते टिकमगड मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मोदींच्या नेतृत्वातील पहिल्या सरकारमध्ये ते अल्पसंख्याक मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जात नाही, तोपर्यंत हंगामी अध्यक्ष कामकाज सांभाळतात. हंगामी अध्यक्ष हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीला केलं जातं. हंगामी अध्यक्ष सभागृहातील इतर खासदारांना शपथ देतो. नव्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर हंगामी अध्यक्षांचा कार्यभाग संपुष्टात येतो.
भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 1:33 PM