डीआरएटीच्या दिल्ली प्राधिकरणात मागणार दाद मनपाचा निर्णय : हुडको थकीत कर्ज प्रकरण
By admin | Published: March 18, 2016 10:26 PM
जळगाव- हुडकोने मनपाकडील थकीत कर्जासंदर्भात तडजोडीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाही पुन्हा डीआरटीत अर्ज देऊन मनपाची सर्व बँक खाती सील करण्याची मागणी केली आहे. त्यावर मनपाने मुंबईतच डीआरएटीकडे अपिल दाखल केले होते. मात्र बेंच उपलब्ध नसल्याने डीआरएटीच्या दिल्ली प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
जळगाव- हुडकोने मनपाकडील थकीत कर्जासंदर्भात तडजोडीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाही पुन्हा डीआरटीत अर्ज देऊन मनपाची सर्व बँक खाती सील करण्याची मागणी केली आहे. त्यावर मनपाने मुंबईतच डीआरएटीकडे अपिल दाखल केले होते. मात्र बेंच उपलब्ध नसल्याने डीआरएटीच्या दिल्ली प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार मनपाचे मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत खरात हे शनिवारी तातडीने मुंबईला रवाना होत असून तेथे मनपाचे वकील ॲड. जितेंद्र गायकवाड तसेच मनपाने नव्याने नियुक्त केलेल्या दोन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करून विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत. सोमवारी दिल्ली येथे डीआरएटीत अपिल सुनावणीसाठी दाखल केले जाईल. तसेच मनपाचे विधी विभाग प्रमुख सुभाष मराठे तसेच लेखा विभागातील संबंधित कर्मचारीही आवश्यक कागदपत्र घेऊन जळगावहून थेट दिल्लीला रवाना होणार आहेत. हुडकोने मनपाची बँक खाती सील करण्यासाठी दिलेल्या अर्जाला स्थगिती मिळवण्यासाठी मनपाची धडपड सुरू असून त्यासाठीच लवकरात लवकर स्थगिती मिळविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.