देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मिर्झापूरच्या महिला शेतकरी वंदना सिंह या पंतप्रधानांचे स्वप्न साकार करत आहेत. वंदना सिंह यांनी यूट्यूब आणि गुगलवरील व्हिडीओ पाहून ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. आज त्या लाखो रुपयांचा नफा कमावत आहे. त्यांना यावर्षी 5 लाखांचा नफा झाला आहे. त्या केवळ स्वावलंबी झाल्या नाहीत तर इतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. जिल्हा दंडाधिकारी दिव्या मित्तल यांनी महिला शेतकरी वंदना सिंह यांचाही गौरव केला आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील इमिलियाचट्टी येथील महिला शेतकरी वंदना सिंह बालुवा या बजाहूर गावात अर्धा एकर जमिनीत ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. वंदना सिंह या आता शेती करून लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. वंदना सिंह यांनी एके दिवशी आपल्या स्मार्टफोनवर युट्यूबवर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा व्हिडीओ पाहिला. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीने वंदना सिंह यांना प्रभावित केले. गुगलच्या माध्यमातून शेतीची माहिती घेतल्यानंतर उद्यान विभागाकडून शेतीसाठी सहकार्य मिळाले. त्यानंतर वंदना सिंह यांनी अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली, त्यातून त्यांना यावर्षी पाच लाख रुपयांचा नफा झाला. ड्रॅगन फ्रूटच्या मधोमध स्ट्रॉबेरीचीही लागवड केली असून, त्यातून भरपूर नफा मिळत आहे.
ड्रॅगन फ्रूटमध्ये नफा मिळाल्यानंतर आता महिला शेतकरी आणखी एक एकर जमिनीवर ड्रॅगन फळाची लागवड करणार आहेत. यासाठी स्वत: ड्रॅगन फ्रूटची रोपवाटिका उभारली असून, त्यानंतर ते रोप शेतात लावले जाणार आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यासाठी खडी, लोखंडी रिंग टायर आणि शेणखत आवश्यक आहे. पहिल्या व दुसऱ्या वर्षी कमी नफा मिळतो, मात्र तिसऱ्या वर्षापासून या शेतीतून लाखो रुपयांचा नफा होतो. वंदना यांनी सांगितले की, ड्रॅगन फ्रूटचं एक रोप 50 रुपयांना विकली जातं. ड्रॅगन फ्रूट शेतातून थेट वाराणसीला नेले जाते, तिथे ते 400 रुपये किलो दराने विकले जाते.
शेतकरी वंदना सिंह यांनी सांगितले की, ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याची कल्पना यूट्यूबवरून आली. ही शेती करण्यासाठी उद्यान अधिकारी मेवाराम यांचे सहकार्य लाभले. ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीतून यावर्षी 5 लाख रुपयांचा नफा कमावला. ड्रॅगन फ्रूट शेती महिलांसाठी सर्वोत्तम आहे. घरातील कामे करून काही वेळ खर्च करून ड्रॅगन फ्रूटची लागवड करून महिला चांगला नफा कमावत आहेत. ड्रॅगन फ्रूट शेतीतून एक-दोन नाही तर चारपट नफा मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेती करण्यास सुरुवात केली, त्यांना अनेक ठिकाणी शेतीसाठी सन्मानित करण्यात आले. ड्रॅगन फ्रुटसह उर्वरित जमिनीवर स्ट्रॉबेरी, हळद यांची लागवड केली असून, त्यातूनही भरपूर नफा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"