शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Coronavirus : अँटी कोरोना औषध ११-१२ मेपासून उपलब्ध होणार; DRDO च्या अध्यक्षांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 4:53 PM

Coronavirus anti covid drug : आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याची DRDO ची माहिती

ठळक मुद्देआजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याची DRDO ची माहिती११,१२ मेपासून औषध होणार उपलब्ध

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे.  त्यातच लस, औषधे, ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा वेळेस डीआरडीओने कोरोनावर बनविलेल्या नव्या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊन औषध महानियंत्रकानी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) असे नाव असलेल्या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात. तसेच त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते. (Another medicine on the corona; Approval for emergency use of medicine manufactured by DRDO). दरम्यान, ११-१२ मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला आहे. "सुरुवातीला या औषधाचे कमीतकमी १० हजार डोस बाजारात येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांनी हे औषध घ्यावं," असंही रेड्डी म्हणाले. इंडिया टीव्हीशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. "डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या औषधाला औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे. या औषधाच्या जोसनंतर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला २-३ दिवसांमध्ये ऑक्सिजन सपोर्टवरून काढता येईल. ते लवकरच बरे होती. लवकरच हे औषध रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल," असही ते म्हणाले. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स (आयएनएमएएस) व हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) या दोन संस्थांनी संशोधन करून कोरोनावरील नवं औषध बनवलं आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज या औषधाचे उत्पादन करणार आहे.आजवर तीनवेळा मानवी चाचण्याया औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओनं म्हटलं आहे. देशभरात ११ रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. तर ज्यांना हे औषध दिले नव्हते त्या रुग्णांपैकी फक्त ३१ टक्के रुग्णांनाच बाहेरून दिलेल्या ऑक्सिजनची गरज उरली नाही. डीआरडीओच्या २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) या नव्या औषधाने ज्यांची प्रकृतीत मोठी सुधारणा झाली, त्यामध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची लक्षणीय संख्या आहे.कोरोनाशी मुकाबला करताना भारताने कोवॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसी बनविल्या. आता डीआरडीओने कोरोनावर स्वदेशी बनावटीचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज हे नवे औषध बनवून संशोधनातील एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.असे आहे नव्या औषधाचे स्वरूपडीआरडीओचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते. देशात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना हे गुणकारी औषध त्यांच्यासाठी वरदान ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

४२% रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज नाहीया औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDRDOडीआरडीओmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल