नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाला एका अशा स्मार्ट बॉम्बची आवश्यकता होती, जो स्वत: नेविगेट आणि ग्लाईड करत शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करेल. या कामामध्ये डीआरडीओने मदत केली. त्यांच्या शास्त्रज्ञांनी दोन प्रकारच्या बॉम्बचे डिझाईन तयार केले. हे डिझाईन तयार केल्यानंतर बॉम्ब तयार करण्याची जबाबदारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीवर आली. त्यांनी दोन बॉम्ब तयार केले. त्यातील एक म्हणजे पंखांच्या मदतीने उड्डाण करणारा गौरव- लाँग रेंज ग्लाईड बॉम्ब. तर दुसरा बॉम्ब म्हणजे गौथम.
ही दोन्ही प्रेसिशन गाइडेड हत्यारे आहेत. यांचा वापर सर्वसाधारणपणे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्समध्ये रेंजच्या बाहेर असलेल्या टार्गेट्सना उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात येईल. त्यामुळे आपल्या लढाऊ विमानांचा बचाव करण्याची आणि नुकसान टाळण्यास मदत होईल. गौरव १०० हजार किलोचा पंख असलेला लांब पल्ल्यापर्यंत मारा करणार बॉम्ब आहे. तर गौथम हा ५५० किलोचा पंख नसलेला बॉम्ब आहे. दोन्ही बॉम्बची लांबी ४ मीटर आहे. तर दोघांचा व्यास हा ०.६२ मीटर आहे.
गौरव आणि गौथम या दोन्ही बॉम्बमध्ये सीएल-२० म्हणजेच फ्रेग्मेंटेशन आणि क्लस्टर म्युनिशन लावलेले आहेत. ते टार्गेटपासून कॉन्टॅक्ट करताच प्रॉक्सिमिटी फ्यूज करतात. त्यामुळे बॉम्बमधील स्फोटकांचा स्फोट होते. गौरवची १०० किमीपर्यंत ग्लाईड करण्याची क्षमता आहे. तर गौथम हा ३० किमी पर्यंत उड्डाण करू शकतो. हे बॉम्ब १० किमी पर्यंत उंचावर जाऊ शकतात.
दोन्ही बॉम्बमध्ये इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टिम लावलेला आहे. तो जीपीएस आणि नाविक सॅटेलाईट गाइडेंस सिस्टिमच्या मदतीने टार्गेटपर्यंत पोहोचतो. त्याला सुखोई सू-३० एमकेआय फायटर जेटवर तैनात केले जाऊ शकते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये बालासोरमध्ये सुखोई फायटर जेटमधून गौरवची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. यापूर्वी २०१४ मध्ये त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. दोघांची सध्याची अपग्रेडेड रेंज ५० ते १५० किमीच्या आसपास आहे.