बंगळुरू - डीआरडीओच्या रुस्तम 2 या यूएव्हीला (मानवरहीत विमानाला) आज सकाळी कर्नाटकमध्ये अपघात झाला. रुस्तमची चाचणी सुरू असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील जोडीचिकेनहल्ली येथे हा अपघात झाला. दरम्यान, डीआरडीओचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. चेलकेरे एअरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे आऊट-डोर परीक्षण केले जाते. डीआरडीओकडून येथे प्रामुख्याने मानवरहीत विमानांबाबत काम होते. दरम्यान, आजचा अपघात हा याच रेंजच्या आसपास झाला आहे.
कर्नाटकमध्ये डीआरडीओचे रुस्तम कोसळले, चाचणीदरम्यान झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:32 AM