नवी दिल्ली : हल्ली कोणत्याही घरगुती समारंभाला, वाढदिवस, साखरपुडा, लग्नसोहळा आदी खासगी कार्यक्रमांचे चित्रण ड्रोन कॅमेऱ्यांमार्फत केले जाते. ड्रोन कॅमेºयाच्या मदतीने छायाचित्रे व चित्रीकरण करण्याचा ट्रेंडच आहे अनेक ठिकाणी. पण यासाठी परवानगी घ्यावी लागते. तुमच्याकडे ड्रोन असल्यास त्याची नोंद ३१ जानेवारीपर्यंत करावी लागणार आहे.
ड्रोनची नोेंद न केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे स्वत:कडे ड्रोन असणाºया सर्वांनी त्याची नोंद करावी, अशा सूचना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केल्या आहेत. नोंदणीची ही प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. अमेरिकेने इराणवर ड्रोनद्वारे हल्ला केल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नोंदणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ड्रोन बाळगणारी व्यक्ती, कंपनी वा कंपनीचे संचालक अनेकदा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या नियमांचे पालन करीत नाहीत, असे आढळून आले आहे. त्यांनी ड्रोनची माहिती आम्हाला देणे आणि त्याची नोंद करणे बंधनकारक आहे.
ही माहिती संबंधित व्यक्ती, कंपनी वा कंपनीचे संचालक यांनी स्वत:हून देणे गरजेचे आहे. ड्रोन बाळगणाºयांनी नोंदणी ३१ जानेवारीपर्यंत आॅनलाइन पद्धतीने करणे अपेक्षित आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंबंधात आॅगस्ट २0१८ रोजी एक नियमावली तयार केली होती. ड्रोन बाळगणाºयांनी तिचे पालन करणेही बंधनकारक आहे.मिळेल युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांकप्रत्येक ड्रोनसाठी युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक दिला जातो. ड्रोन असणाºयांनी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास त्यांना युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक देण्यात येईल. याशिवाय वाहनांप्रमाणेच ड्रोनसाठीही परमिट असणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक नाही, त्यांनाच ड्रोन उडवण्याचा आणि बाळगण्याचा अधिकार असेल.