प्रयागराज - उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद व त्याचा साथीदार गुलाम या दोघांचा एन्काऊंटर करत त्यांना ठार केलं. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या दोघांचा खात्मा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या काम-काजाची चर्चा रंगली असून या एन्काऊंववरुचं समर्थन आणि विरोधही केला जात आहे. दरम्यान, मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज असद अहमदच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोशल मीडियावर आणि अनेक राजकीय नेतेमंडळींनीही या एन्काऊंटरचं समर्थन केलंय. मात्र, युपीतील विरोधी पक्ष असलेल्या सपाने आणि एमआयएमने या एन्काऊंटरचा विरोध केला आहे. तसेच, युपीत कायदा व सुव्यवस्थाच नसल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, ज्या दिवशी ही एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी माफिया अतिक अहमदला आज प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या मुलाचा एनकाउंटर झाल्याची माहिती देण्यात आली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला येता आले नाही. केवळ जवळच्या नातेवाईकांसह २५ जणांच्या उपस्थितीत असिद अहमदचा दफनविधी पार पडला. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी पल्बीक आणि मीडियाला दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता.