शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
5
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
8
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
9
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
10
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
11
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
12
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
13
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
14
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
15
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
16
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
17
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
18
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
19
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

BREAKING: जम्मूत आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन; सुरक्षा दलाकडून २५ राऊंड फायरिंग, शोध मोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:17 PM

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी लष्करी तळालाही लक्ष्य करण्याचा  प्रयत्न केला. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालूचक लष्करी तळावर दोन ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं. लष्कर सज्ज असल्यानं ड्रोन दिसताच त्यावर २० ते २५ राऊंड फायरिंग करण्यात आलं आहे. 

कालचूक लष्करी तळावर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास हे दोन ड्रोन घिरट्या घालत होते. त्यावेळी लष्करानं तातडीनं प्रत्युत्तर देत हवेत फायरिंगला सुरुवात केली. त्यानंतर ड्रोन गायब झाले. लष्करानं सध्या ड्रोनच्या शोध मोहिमेला सुरुवात केली आहे, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे. 

एअरबेसवर काल झाला होता हल्लाजम्मूच्या एअरफोर्स स्टेशनवर रविवारी रात्री दोन स्फोट झाले होते. पहिला स्फोट रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी तर दुसऱ्या ५ मिनिटांनंतर १ वाजून ४२ मिनिटांनी झाला होता. हवाई दलाच्या माहितीनुसार, या स्फोटांची तीव्रती खूप कमी होती. यातील पहिला स्फोट छतावर झाला. त्यामुळे छताचं नुकसान झालं आहे. तर दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला आहे. यात दोघं किरकोळ जखमी झाले आहेत. ड्रोनच्या सहाय्यानं हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एनआयएकडून आता हल्ल्याची चौकशी केली जात आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्ला