श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनच्या संशयास्पद कारवाया वाढल्या आहेत. बुधवारी रात्री जम्मूतील एअर फोर्स स्टेशनजवळ एक संशयित ड्रोन दिसून आला. जम्मू-काश्मीरमध्ये संशयित फ्लाइंट ऑब्जेक्ट दिसण्याची ही मागील दोन दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी, मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर एक उडणारी वस्तु दिसली होती.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, अरनिया सेक्टरमध्ये 14 जुलैच्या रात्री 9.52 वाजता 200 मीटर उंचीवर एक लाल लाइट असलेली उडती वस्तु दिसली होती. जवानांनी त्यावर फायरिंग सुरू केली. पण, वस्तुला गोळी लागली नाही आणि ती माघारी परतली. मागच्या काही आठवड्यांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये ड्रोन अॅक्टिव्हीटीज पाहायला मिळत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने श्रीनगर, कुपवारा, राजौरी आणि बारामूलामध्ये ड्रोन उड्डाणांवर बंदी लावण्यात आली आहे.
जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता26 जूनच्या रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. त्यात दोन जवान किरकोळ जखमी झाले होते. 5 मिनीटांच्या अंतराने दोन ब्लास्ट झाले. यावळी ड्रोनद्वारे एअरफोर्स स्टेशनवर दोन IED टाकण्यात आले. जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंह यांनी त्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले होते.