- सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू : काश्मिरातील सफरचंदाचे शहर असलेल्या सुपर मध्ये आज उत्सवाचा माहोल होता. कारण एका दशकानंतर तेथे विधानसभेसाठी मतदान होत होते. भात कलान भागातील एका मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केल्यानंतर दोन व्यक्ती रडताना दिसल्या.
गुलाम हसन मीर यांचा मुलगा उमर काही वर्षांपूर्वी दहशतवादी झाला. डबडबलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, मी माझ्या त्या मुलाला घरी परत येण्याचे आणि कुटुंबासोबत शांततापूर्ण जीवन जगण्याचे आवाहन करतो. मतांमुळे जे प्राप्त करता येते ते बंदुकांमुळे प्राप्त करता येत नाही.
दुसरी व्यक्ती हमजा म्हणाले, जर मतदान माझ्या मुलाला परत आणत असेल तर मी ही संधी कधीही सोडणार नाही. माझ्या मुलाचे नाव बिलाल आहे. तो चुकीच्या मार्गाला लागला आहे. त्याने घरी परत यावे.
जम्मू काश्मिरात अंतिम टप्प्यात ६८.७२% मतदानश्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६८.७२% मतदान झाले. ३७० कलम रद्द केल्यानंतर झालेली पहिली निवडणूक तुरळक प्रकार वगळता शांततेत पार पडली. ८ ऑक्टाेबरला निकाल येतील.
तीन टप्प्यांतील मतदानदिनांक टप्पा जागा मतदान१८ सप्टेंबर पहिला २४ ६१.३८%२५ सप्टेंबर दुसरा २६ ५७.३१%१ ऑक्टोबर तिसरा ४० ६८.७२%