नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याच्या तपासातून उघड झालेल्या ‘ड्रग्ज कनेक्शन’बाबत एनसीबीची शोध मोहीम सुरूच आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तस्करांकडून गांजा व चरस जप्त केला आहे. त्यांच्याकडून बॉलीवूड कनेक्शनबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले होते. आता, भाजपा खासदार आणि अभिनेता रवि किशन यांनी संसदेतील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा उचलून धरला आहे.
अमली पदार्थप्रकरणीरिया चक्रवर्ती, भाऊ शोविक व अन्य काही जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे एसीबीने शनिवारी मुंबईत छापे टाकून करमजीत सिंग, अँथनी फर्नांडिस, अंकुश अरेणा, अनुज केशवाणी व अन्य दोघांना अटक झाली.आरोपींकडून एकूण ९०० ग्रॅम गांजा, सव्वा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर गोव्यातून ख्रिस कोस्टाला अटक केली आहे. त्याच्याकडून बॉलीवूडमध्ये तस्करी करणारे रॅकेट व त्याचे सेवन करणाऱ्याची माहिती घेतली जात असल्याचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.
एकीकडे सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळीच दिशी मिळाली असून ड्रग्ज तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि खासदार रवि किशन यांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. देशात पाकिस्तान व चीनमधून नशिल्या पदार्थांची तस्करी होत आहे. देशातील तरुण पीढीला उदध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे सांगत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रवि किशन यांनी केली आहे.
बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्ज रॅकेटचा शिरकाव झाल्याचे सांगत, एनसीबीकडून तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले. मात्र, याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, असेही खासदार किशन यांनी म्हटले.
संसदेतील 17 खासदारांना कोरोना
संसदेचे पावसाळी अधिवेच्या शन आजपासून सुरू झाले असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत पाच खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. कोरोनामुळे सध्या सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे. त्यातच आज कामकाज सुरू होण्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार लोकसभेच्या तब्बल 17 खासदारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. तर, अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.