शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Drugs Delhi Airport: दिल्ली विमानतळावर 432 कोटींचे ड्रग्स जप्त, लोखंडी रॉडमध्ये लपवला होता माल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 1:17 PM

Drugs Delhi Airport: महसूल गुप्तचर संचालनालयाने दिल्ली विमानतळातून 434 कोटी रुपयांचे 62 किलो हेरॉईन जप्त केले आहे.

नवी दिल्ली: दिल्लीविमानतळातून ड्रग्स तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) दिल्ली विमानतळातून 62 किलो हेरॉईन(Drugs) जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 434 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा संपूर्ण माल एका एअर कार्गोमधून जप्त केला आहे. 

ऑपरेशन ब्लॅक अँड व्हाईट मोहिमेअंतर्गत डीआरआयने या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. युगांडातून कार्गो विमानात ट्रॉली बॅगमध्ये 62 किलो हेरॉईन आणण्यात आले होते. DRE सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडातील एंटेबे येथून येणारा हा एअर कार्गो दुबईमार्गे एअर कार्गो कॉम्प्लेक्स IGI विमानतळ नवी दिल्ली येथे पोहोचला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 434 कोटी रुपये आहे.

स्टीलच्या रॉडमध्ये हेरॉईनविशेष म्हणजे, तस्करांनी हेरॉईन पिशवीत न भरता स्टीलच्या रॉडमध्ये भरले. हा माल कसाबसा युगांडातून दुबईत आला, पण विमान दिल्लीला पोहोचताच तो एजन्सीला सापडला. भारतात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आल्याची माहिती डीआरआयला आधीच मिळाली होती. विमानतळावरून 55 किलो आणि गुरुग्राममधून 7 किलो जप्त करण्यात आल्याचे डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह 50 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

तिघांना अटकया प्रकरणी DRI ने आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. हेरॉईनची ही खेप एअरकार्गोमधून पकडल्यानंतर डीआरआयच्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यानंतर या व्यक्तीच्या चौकशीच्या आधारे हरियाणा आणि लुधियाना येथे छापे टाकण्यात आले. जिथून आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एक व्यक्ती दिल्लीचा असून अन्य दोघे लुधियानाचे रहिवासी आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थdelhiदिल्लीAirportविमानतळ