शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वारा ठार कुसंुब्याजवळ अपघात : बैल घेऊन जाणार्‍या ट्रकने दिली धडक

By admin | Published: February 11, 2016 11:00 PM

जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या आयशरने समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मनोहर सुभाष इंगळे (वय २८ रा.रोईनखेडा ता.मुक्ताईनगर जि.बुलढाणा ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी दीड वाजता कुसुंबा गावाजवळ महामार्गावरील हॉटेल निलांबरी समोर झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या आयशरने समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मनोहर सुभाष इंगळे (वय २८ रा.रोईनखेडा ता.मुक्ताईनगर जि.बुलढाणा ह.मु.कुसुंबा ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी दीड वाजता कुसुंबा गावाजवळ महामार्गावरील हॉटेल निलांबरी समोर झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
मनोहर हा कुसुंबा येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.डी.९०६४) जळगाव शहरात येत होता तर धुळे येथून आयशर (क्र.एम.एच.१८ ए.ए.०५६४) बैल घेवून औरंगाबादकडे जात होता. हॉटेल निलांबरीसमोर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मनोहर याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.याच वेळी रस्त्याने येणार्‍या हितेश रवींद्र नेवे या तरुणाने तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. कोळी व पोलिसांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मनोहरचा कचोरी विक्रीचा व्यवसाय
मनोहर याची परिस्थिती अत्यंत हलाखीचे आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी तो कुसुंब्यात स्थायिक झाला होता. गेल्या चार वर्षापासून तो भगीरथ कोळी यांच्या घरात पत्नीसह भाड्याने रहात होता. घरी कचोरी बनवून कुसुंबा बसस्थानकावर व्यवसाय करीत होता. चांगल्या स्वभावामुळे त्याने अल्पावधितच ग्रामस्थांची मने जिंकली होती.

पत्नीचा प्रचंड आक्रोश
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पत्नी स्वाती व शेजारी राहणार्‍या महिला, पुरुषांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पतीचा मृतदेह पाहताच पत्नीने हंबरडा फोडत प्रचंड आक्रोश केला. तिला सावरणार्‍या महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. मनोहर याच्या प›ात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. अपघाताची माहिती त्याच्या गावात कळविण्यात आली आहे.

बैल गोशाळेत रवाना
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे,कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील यांनी आयशर चालक सुलतान सैयद मुनाब (रा.धुळे)याला ताब्यात घेऊन ट्रकमधील अकरा बैलांना कुसुंबा येथील गोशाळेत पाठविण्यात आले. अपघातासह बैलांची निर्दयापणे वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे धारबळे यांनी सांगितले.