शीलेश शर्मा / नवी दिल्लीआपले पितळ उघडे पडेल या धास्तीमुळे संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या कार्यक्रम पत्रिकेलाच गुरुवारी अचानक बदलण्यात आले. त्याचे कारण म्हणजे कोणालाही लक्ष्यभेदी लष्करी कारवाईची (सर्जिकल आॅपरेशन) वस्तुस्थिती समजू नये. परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या पक्षांनी मूळ कार्यक्रम पत्रिकेवरच चर्चा करायची अशी भूमिका घेतल्यामुळे शुक्रवारी होणारी ही बैठक अडचणीत सापडली आहे. या बैठकीत ताज्या सर्जिकल आॅपरेशन आणि लष्कराच्या विद्यमान परिस्थितीवर चर्चा व्हायची आहे. परंतु कार्यक्रम पत्रिकाच बदलल्यामुळे सगळेच महत्वाचे विषय बाजुला टाकले गेले आहेत. साहजिकच विरोधी पक्ष फारच नाराज झाला आहे.कार्यक्रम पत्रिकेत ऐनवेळी बदल करण्यात आल्यामुळे मोठा वाद उभा ठाकला आहे. काँग्रेसने तर बदल स्विकारायलाच नकार दिला. आधीच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार या बैठकीत २९ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्जिकल आॅपरेशनचा तपशील लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून सादर केला जाणार होता. नव्या कार्यक्रम पत्रिकेतून हा विषय वगळण्यात आला आहे.
टीकेच्या भीतीने सरकारने कार्यक्रम पत्रिका बदलली
By admin | Published: October 14, 2016 1:27 AM