सांगली : खरीप हंगामात ३६३ गावे टंचाईग्रस्त झाल्यानंतर, आता यंदाच्या रब्बी हंगामालाही दुष्काळाचा शाप लागला आहे. जिल्ह्यातील रब्बी पिकांची तब्बल १0४ गावे दुष्काळाच्या छायेत आहेत. या गावांची सुधारित पैसेवारी ५0 पेक्षा कमी असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला प्रत्येक हंगामात फटका बसत आहे. शेकडो गावांमधील रब्बी, खरीप हंगाम वाया जाताना, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळत आहे. निसर्गाच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या या गावांना आता शासनभरोसेच राहावे लागणार आहे. कायम दुष्काळी तालुक्यांबरोबरच सधन तालुक्यांमध्येही कमी पावसाचा फटका बसला आहे. तरीही जत आणि आटपाडी तालुक्यातील दुष्काळाचे चटके सर्वाधिक आहेत. सर्वेक्षणात पन्नासपेक्षा कमी पैसेवारी आढळलेल्या १0४ गावांचे अंतिम सर्वेक्षण ३१ मार्चला होऊन त्यांच्यावर दुष्काळी म्हणून शिक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या हंगामात खरीप पिकांची ३६३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ रब्बीची १०४ गावे त्याच वाटेवर आहेत. पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने पाणी टंचाईचे सावट वाढत चालले आहे. रब्बी हंगामही हातातून गेला आहे. रब्बी पिके वाचण्याची शक्यता मावळली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यात रब्बी पिकांची जी गावे आहेत, तेथील रब्बी पिकांची सुधारित पैसेवारी काढण्यात आली. यापूर्वी १५ डिसेंबरला केलेल्या सर्वेक्षणात ८० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी होती. आता यामध्ये आणखी २४ गावांची भर पडली आहे. (प्रतिनिधी) ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणारी तालुकानिहाय गावे जत : जत, अमृतवाडी, बिळूर, देवनाळ, मेंढेगिरी, उमराणी, खोजनवाडी, कुडणूर, शेगाव, निगडी खुर्द, बागलवाडी, वळसंग, व्हसपेठ, काराजनगी, मायथळ, घोलेश्वर, कुणीकोणूर, संख, खंडनाळ, गोंधळेवाडी, तिकोंडी, करेवाडी (ति.), पारधेवस्ती, कोंत्येवबोबलाद, कोणबगी, मोटेवाडी (को.), अंकलगी, कुलालवाडी, आसंगीतुर्क, कागनरी, मोटेवाडी (आ.), धुळकरवाडी, मोरबगी, जालिहाळ (बु.), दरीबडची, लमाणतांडा (द.ब.), करजगी, सुसलाद, बेळोंडगी, सोनलगी, माणिकनाळ, आक्कळवाडी, उमदी, बोर्गी (खु.), विठ्ठलवाडी, गुलगुंजनाळ, बालगाव, हळ््ळी, उटगी, निगडी (बु.), लमाणतांडा, उटगी, गिरगाव, लवंगा, बेवनूर, रेवनाळ, अचकनहळ््ळी, कासलिंंगवाडी, कुंभारी, मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, शेड्याळ, रावळगुंडवाडी, उंटवाडी, सोरडी, दरिकोणूर, गुड्डापूर, आसंगी. आटपाडी : आटपाडी, पुजारवाडी (आ.), भिंंगेवाडी, मापटेमळा, देशमुखवाडी, माडगुळे, य.पा.वाडी, खांजोडवाडी, लेंगरेवाडी, मासाळवाडी, पिंंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, शेटफळे, पात्रेवाडी, तडवळे, बनपुरी, करगणी, गोमेवाडी, दिघंची, उंबरगाव, पुजारवाडी-दि, पांढरेवाडी-दि, राजेवाडी, लिंंगीवरे, विठलापूर, कौठुळी, शेरेवाडी, निंंबवडे, वाक्षेवाडी, आवळाई, पिसेवाडी, पळसखेल, गळवेवाडी.
जिल्ह्यातील रब्बीलाही दुष्काळाचा शाप
By admin | Published: February 03, 2016 12:29 AM