ेलग्नात नाचण्याच्या कारणावरुन दोघांवर तलवार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 12:37 AM
फोटो
फोटोजळगाव: लग्नात नाचण्याच्या कारणावरुन झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या रेखाबाई राजू गायकवाड (वय ४०) व किरण शालीक बाविस्कर या दोन तलवार हल्ला झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खेडी बु.गावातील इंदीरा नगरात घडली. दरम्यान, या हल्लयाप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठत दोषींना तत्काळ अटक करण्यासह पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी पोलीस अधिकार्यांना धारेवर धरले.खेडी येथे बजरंग सपकाळे याच्या लग्नाच्या हळदीत नाचण्यावरुन शनिवारी वाद झाला होता. लोकांनी मध्यस्थी करुन हा वाद रात्रीच मिटविला होता. रविवारी दुपारी याच कारणावरुन शंकर मराठे, निलेश वंजारी, गोलु, गणेश, पंकज, जावळे व अन्य दहा ते पंधरा जण कालिंका माता मंदिराकडून लाठ्या-काठ्या व तलवारी घेवून गावात घुसले. सचिन राजू गायकवाड याच्या घराजवळ आल्यानंतर योगेश पाटील कुठे आहे.त्याला मारायचे आहे, असे म्हणत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.सचिन व योगेश यांना त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. हा वाद पाहून सचिनची आई रेखा ही धावतच आली. समजूत घालत असतानाच त्यातील दोन जणांनी त्यांच्या हाताच्या पंजावर तलावर हल्ला केला. रेखा गायकवाड यांना वाचविण्यासाठी आलेल्या किरण यांच्याही हातावर त्यांना तलवारीने वार केला.जिल्हा रुग्णालयात दाखलया हल्लयात जखमी झालेल्या रेखा गायकवाड व किरण बाविस्कर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सचिन राजू गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन सात जणांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस स्टेशनला गोंधळतलवार हल्लयाच्या पार्श्वभूमीवर खेडी येथील इंदीरा नगर भागातील नागरीकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून दोषींवर कारवाई व अटक करण्याची मागणी केली. दिवसाढवळ्या २० ते २५ जणांनी गावात लाठ्या-काठ्या व तलवारी आणून दहशत माजविली. त्यामुळे संपुर्ण गाव दहशतीखाली आहे. शिवाय पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यामुळे हल्लेखोरांकडून भीती व्यक्त केली. गावकर्यांना काही दिवस पोलीस संरक्षण मिळावे यासाठी गोंधळ घातला. सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी संतप्त जमावाची समजूत काढून दोषींना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.