शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हक्कभंग प्रस्तावांमुळे गदारोळात आणखी भर

By admin | Published: March 03, 2016 3:47 AM

संसदेच्या उभय सभागृहात मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावरून बुधवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये तुफान खडाजंगी झाली.

नवी दिल्ली : संसदेच्या उभय सभागृहात मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावरून बुधवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये तुफान खडाजंगी झाली. काँग्रेस या प्रस्तावाबाबत मंगळवारपासून आग्रही आहे. प्रत्युत्तरादाखल भाजपने लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे तर राज्यसभेत जद (यु)च्या के.सी. त्यागींविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करून या गदारोळात आणखी भर घातली आहे.सभागृहात स्मृती इराणींवरील हक्कभंग प्रस्तावामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपच्या मदतीला अण्णाद्रमुकचे सदस्य ठामपणे उभे राहिले आहेत. गेले दोन दिवस उभय सभागृहात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची एअरसेल मॅक्सिस प्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीवरून अद्रमुक सदस्यांनी तुफान गोंधळ घातला. बुधवारी राज्यसभेत या गोंधळामुळे शून्यप्रहराचे कामकाजही होऊ शकले नाही. अण्णाद्रमुकचे नवनीतकृष्णन यांची मागणी फेटाळतांना उपसभापती कुरियन म्हणाले, सदर विषयासाठी उचित नोटीस दिल्याशिवाय हा विषय तुम्हाला सभागृहात मांडता येणार नाही. तरीही गदारोळ थांबला नाही अखेर राज्यसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले. राज्यसभेत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलांच्या कन्या अनार यांना कवडीमोल दराने जमीन देण्याचा मुद्दा, काँग्रेसचे प्रमोद तिवारी मांडू इच्छित होते मात्र सभागृहातील गदारोळामुळे त्यांना तो मांडता आला नाही. (विशेष प्रतिनिधी)1 लोकसभेत इशरत जहां प्रकरणावरून भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, सुरूवातीला लष्करची वेबसाईट, त्यानंतर डेव्हिड हेडलीचे निवेदन आणि आता अंतर्गत सुरक्षेचे माजी गृहसचिव यांचा खळबळजनक खुलासा यामुळे संसदेत इशरत जहां प्रकरणी चर्चा झाली पाहिजे, असे मला वाटते. 2 लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात तर राज्यसभेत शून्यप्रहरात विविध विषयांवर उभय पक्षांनी घोषणाबाजी करीत परस्परांवर शरसंधान केले.3 लोकसभेत तृणमूल सदस्यांनी पाठराखण केल्यानंतर गटनेते खरगेंना हक्कभंग प्रस्तावाचे प्रास्ताविक अध्यक्षांनी करू दिले.