शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

जीएसटीमुळे राज्यांचा रुपया बुडणार नाही

By admin | Published: December 20, 2014 2:58 AM

देशाच्या अप्रत्यक्ष कर आकारणी पद्धतीत आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) लागू करण्यासाठीचे बहुप्रतिक्षित घटनादुरुस्ती विधेयक सरकारने शुक्रवारी लोकसभेत सादर केले.

नवी दिल्ली : देशाच्या अप्रत्यक्ष कर आकारणी पद्धतीत आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) लागू करण्यासाठीचे बहुप्रतिक्षित घटनादुरुस्ती विधेयक सरकारने शुक्रवारी लोकसभेत सादर केले.‘घटना (१२२ वी दुरुस्ती) विधेयक’ संसदेच्या पुढील अधिवेशनात चर्चेसाठी घेतले जाईल व व अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वांच्या सूचना सामावून घेण्याची सरकारची तयारी असेल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले.बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले हे विधेयक लोकसभेत मांडताना जेटली यांनी अशी ग्वाही दिली की, कोणत्याही राज्याचा एक रुपयाचाही महसूल बुडणार नाही, याची काळजी आम्ही घेतली आहे. ‘जीएसटी’ राज्यांसाठी लाभदायीच ठरेल. राज्यांच्या बुडणाऱ्या महसुलाची केंद्र सरकार भरपाई करेल, असे सांगताना जेटली म्हणाले की, केंद्रीय विक्री करातील घटलेल्या वाट्यापोटी ११ हजार कोटी रुपये भरपाईचा पहिला हप्ता येत्या ३१ मार्चपूर्वी राज्यांना दिला जाईल.वस्तूंच्या आंतरराज्य विक्रीवर केंद्र सरकार केंद्रीय विक्री कर आकारते व तो राज्य सरकारे जमा करतात. परंतु राज्यांच्या पातळीवर एप्रिल २००५ पासून ‘व्हॅट’ लागू झाल्यावर केंद्र सरकारने केंद्रीय विक्रीकराचा दर चार टक्क्यांवरून दोन टक्के असा कमी केल्याने राज्यांना मिळणा-या कमी हिश्श्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)