ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ३ - अन्य देशांप्रमाणे भारतातही सेक्स टॉईजची विक्री मोठया प्रमाणात वाढत चालली आहे. भारतात अहमदाबादमध्ये सेक्स टॉईजचा मोठा ग्राहकवर्ग आहे. अलीकडे नवविवाहीत दांम्पत्यांना गिफ्टमध्ये मोठया प्रमाणावर सेक्स टॉईज दिल्या जातात. अशा सेक्ससंबंधी वस्तूची विक्री करणा-या ऑनलाइन पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार लग्नाच्या मुहूर्तांच्या काळात विशेषकरुन नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सेक्स टॉईजची विक्री मोठया प्रमाणावर वाढते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारतात अॅडल्ट गेमच्या खरेदीमध्ये गुजरातचा तिसरा नंबर लागतो. विवाह मुहूर्ताच्या काळात सरासरी ४५०० हजार रुपयापर्यंतच्या ऑर्डर येतात. लग्नाला गिफ्टमध्ये देण्यासाठी १ लाखापर्यंतची सेक्सशुअल उत्पादने ऑर्डर करुन मागवली जातात. नेहमीच्या सेलपेक्षा डिसेंबर ते जानेवारीमध्ये मागणी तीनपट जास्त असते असे दॅटरपर्सनल डॉट कॉमचे सीईओ समीर सारय्या यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
फक्त लग्नकाळातच नव्हे तर उत्सवांच्या दिवसांमध्येही सेक्स टॉईजची विक्री मोठया प्रमाणावर वाढते. नवरात्रीच्या दिवसात विक्री ३६० टक्क्यांनी वाढते. व्हॅलेंटाईन्स डे च्या आधीही मोठया प्रमाणावर सेल होतो. गुजरातमधील आनंद, वापी, भावनगर आणि अंकलेश्वर या छोटया शहरातूनही सेक्स टॉईज विकत घेण्याआधी अनेक शंकांचे निरसन करुन घेतले जाते.
वस्तू विकत घेतल्यामुळे आपण कुठल्या कायद्याच्या कचाटयात अडकणार नाही ना, वस्तू कशी वापरावी,त्याचे फायदे याची माहिती करुन घेतली जाते असे इटसप्लीआझ्युर कॉमच्या सहसंस्थापक दिव्या चौहान यांनी सांगितले. या वस्तू विकत घेणारा वर्ग प्रामुख्याने १८ ते ५० वयोगटातील असून, हा बोल्डपणा फक्त पुरुषांपुरता मर्यादीत नाही तर महिलाही अशा वस्तूंची ऑर्डर करण्यात मागे नाहीत.