शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

घरात पत्नीच्या जाचाला वैतागून मुख्याध्यापकांनी शाळेतच थाटला संसार, आता झाली अशी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 8:22 PM

Teacher News: पत्नीसोबत झालेल्या भांडणाला वैतागून एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी थेट शाळेतच संसार थाटल्याची घटना समोर आली आहे.

लखनौ - पत्नीसोबत झालेल्या भांडणाला वैतागून एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी थेट शाळेतच संसार थाटल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सोशल मीडियावर एक  व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकाने घरात झालेल्या भांडणानंतर शाळेतील एका खोलीतच आपला संसार थाटल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर या शिक्षकाने शाळेच्या खोलीमध्येच आपले बेड आणि आवश्यक ते सामानसुद्धा ठेवले. एवढेच नाही तर शाळेच्या खोलीत मद्यपान केल्याचा आरोपही या शिक्षकावर होत आहे. (Due to his wife's harassment at home, the headmaster started school at school)

शिक्षकाच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीएसएने शिक्षकाला निलंबित केले आहे. तसेच आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. सोशल मीडियावर याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खोलीच्या आत एक डबल बेड दिसत आहे. त्यावर एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. खोलीमध्ये अजून काही सामान टेबलावर ठेवलेले आहे. खोलीमध्ये टीव्हीसुद्धा ठेवलेली आहे. तसेच एकवेळ तुम्हाला हे सर्व सामान्य असल्यासारखे वाटेल, पण येथे मामला काही वेगळाच आहे.

ही घटना माधवगंज ब्लॉकमधील माहिमपूर प्राथमिक विद्यालयातील आहे. येथे एका खोलीमध्ये मुख्याध्यापक सुधीर कुमार यांनी आपला संसार थाटला आहे. सुधीर कुमार शिक्षक असले तरी मुख्याध्यापकपदाचा चार्जही त्यांच्याकडे आहे. दरम्यान, शाळेच्या खोलीत त्यांनी बेड टीव्हीसह इतर साहित्याचीही जमवाजमव केली आहे.

दरम्यान, शाळेच्या आवारात मद्याच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा पसरलेल्या दिसून आल्या. या शिक्षकांवर शाळेत राहत असताना मद्यपान केल्याचा आरोप झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीएसएनी शिक्षणाधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. तेव्हा समजले की, घरात पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर सुधीर कुमारने शाळेलाच आपले घर बनवले होते. त्यानंतर तातडीने शाळेचे आवार रिकामी करून आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकUttar Pradeshउत्तर प्रदेशEducationशिक्षण