मंदाताई आमटेंमुळे दारूबंदी आंदोलनाला बळ
By admin | Published: September 01, 2014 9:33 PM
सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीतील ग्लॅक्सो स्मिथक्लाईन कंपनीतील कामगारांनी प्रलंबित वेतनवाढीच्या करारासंदर्भात कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.ग्लॅक्सो कंपनी व्यवस्थापक आणि कामगार युनियन यांच्यात वेतनवाढीच्या कराराबाबत गेल्या १६ महिन्यांपासून ३० ते ३५ बैठका झाल्या तरी अद्यापही तोडगा निघाला नाही. आज ग्लॅक्सो लॅबरोटरीज एम्लॉईज युनियनच्या शिष्टमंडळाने कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव ...
सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीतील ग्लॅक्सो स्मिथक्लाईन कंपनीतील कामगारांनी प्रलंबित वेतनवाढीच्या करारासंदर्भात कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.ग्लॅक्सो कंपनी व्यवस्थापक आणि कामगार युनियन यांच्यात वेतनवाढीच्या कराराबाबत गेल्या १६ महिन्यांपासून ३० ते ३५ बैठका झाल्या तरी अद्यापही तोडगा निघाला नाही. आज ग्लॅक्सो लॅबरोटरीज एम्लॉईज युनियनच्या शिष्टमंडळाने कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांची भेट घेतली. कंपनी व्यवस्थापन, कामगार युनियन पदाधिकारी यांच्यासमवेत कामगार उपआयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीत अपेक्षित तोडगा निघू शकला नाही. सायंकाळी कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर असंख्य महिला व पुरुष कामगारांनी जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी तेथे आलेल्या डॉ. डी. एल. कराड यांनी मार्गदर्शन करून कामगारांना पाठिंबा दिला. (वार्ताहर)सातपूर : येथील सिएट कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची कामगार उपआयुक्त कार्यालयात वेतनवाढीच्या करारासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अपेक्षित तडजोड न झाल्याने ५ मे रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात सिएट कंपनी व्यवस्थापन दिलीप मोडक, मंजुनाथ राव, राधेश्याम केडिया, अभय पंचाक्षरी, तर मुंबई श्रमिक संघाचे हेमकांत सावंत, स्थानिक पदाधिकारी भिवाजी भावळे, गोकुळ घुगे, सुनील शिंगे, अशोक देसाई, आद्यशंकर यादव यांची वेतनवाढीच्या कराराबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत उत्पादन वाढ या विषयावर एकमत न झाल्याने बैठक आटोपती घ्यावी लागली. आता ४ मे रोजी पुन्हा कामगार उपआयुक्तांनी बैठक बोलावली आहे. (वार्ताहर)