हरभरा डाळ, बेसन, मिरचीच्या भावात घट
By admin | Published: November 14, 2016 2:29 AM
पुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवड्यात फारशी उलाढाल झाली नाही. त्यामुळे बहुतेक वस्तुंचे भाव स्थिर राहिले. तुलनेने हरभरा डाळ, बेसन, मिरचीच्या भावात घट झाली आहे.
पुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील भुसार बाजारात मागील आठवड्यात फारशी उलाढाल झाली नाही. त्यामुळे बहुतेक वस्तुंचे भाव स्थिर राहिले. तुलनेने हरभरा डाळ, बेसन, मिरचीच्या भावात घट झाली आहे. मागील आठवड्यात बुधवारपासून भुसार बाजारावर विपरीत परिणाम झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. खरेदीदारांकडे ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा असल्याने त्यांच्याकडून खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेक व्यवहार धनादेशाद्वारे सुरू आहे. मात्र, त्याला मर्यादा असल्याने बाजारातील उलाढाल मंदावली आहे. बाजारातील उलाढाल ५० टक्क्यांनी खाली आल्याचे व्यापार्यांनी सांगितले.दरम्यान, आठवडाभरात हरभरा डालीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे ५०० रुपयांनी तर बेसनाचे भाव ४०० रुपयांनी खाली आले. तेलामध्ये शेंगदाणा तेलाचे भाव १५ किलोमागे ५० रुपयांनी तर इतर खाद्यतेलाचे भाव सुमारे १० रुपयांनी वाढले आहेत. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून मिरचीची आवक सुरू झाल्याने भाव उतरू लागले आहेत. गुळ, साखर, तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी, शेंगदाणा, साबुदाणा, पोहा, नारळ या वस्तुंचे भाव स्थिर राहिले.---------- घाऊक भाव पुढीलप्रमाणे : खाद्यतेलांचे भाव (१५ किलो/लिटरचे भाव) : शंेगदाणा तेल १६५०-१७००, रिफाइंड तेल १४७५-२१००, सरकी तेल १०४०-११८०, सोयाबीन तेल ११००-११८०, पामतेल ९५०-१०५०, सूर्यफूल रिफाईंड तेल ११२०-१२४०, वनस्पती तूप ९९०-१२२०, खोबरेल तेल १६४०-१६५०. क्विंटलचे भाव : लहान साखर (एस) ३५२५-३५७५. गूळ : नंबर १ : ३२००-३२७५, नंबर २ : ३०७५-३१५०, नंबर ३ : २९५०-३०२५, नंबर ४ : २८५०-२९२५, बॉक्स पॅकिंग : २९००-३४५०. तांदळाचे भाव : उकडा २८०० -३०००, मसुरी ३०००-३२००, सोनामसुरी ३५००-३८००, कोलम ४०००-४३००, कोलम लचकारी ४६००-४८००, चिन्नोर ३८००-४०००, आंबेमोहोर ५५००-६२००, बासमती अखंड ७५००-८०००, बासमती दुबार : ६५००-७०००, बासमती तिबार ७०००-७५००, बासमती मोगरा ३५००-४०००, बासमती कणी २४००-२६००, सेला बासमती ५०००-५५००, ११२१ बासमती : ६२००-७०००, १५०९ : ४५००-५०००. गहू : सौराष्ट्र लोकवन २७००-३१००, मध्य प्रदेश लोकवन २५००-२७००, सिहोर ३४००-३४००, मिलबर २२००-२३००. ज्वारी : गावरान २५००-३८००, दुरी २४००-२५००. बाजरी : महिको २३००-२४००, गावरान २१००-२२००, हायब्रीड १५५०-१९५०. डाळी : (प्रतिक्विंटल) : तूरडाळ ९०००-१०५००, हरभरा डाळ १२०००-१२५००, मूगडाळ ६३००-७०००, मसूरडाळ ६५००-६६००, मटकीडाळ ६५००-७०००, उडीदडाळ ९५००-१००००़ कडधान्ये : हरभरा ११०००-११५००, हुलगा ३६००-३८००, चवळी ५०००-६५००, मसूर ६०००-६२००, मटकी ५२००-५५००, वाटाणा : पांढरा २७००-२८००, हिरवा ३०००-३५००. साबुदाणा : ५०००-५६००. भगर ६५००-७०००, हळद पावडर (१० किलो) ९२०-१३६०, हळकुंड ११००-१६००. शेंगदाणा : स्पॅनिश : ८२००-८७००, घुंगरू ७७००-८१००, गुजरात जाडा ७०००-७५००. गोटा खोबरे : ८०००-८५००. मिरची : ब्याडगी ढब्बी १९,०००-२०,०००, ब्याडगी १ : १९,०००-२०,०००, २ : १६,०००-१७,०००, खुडवा ब्याडगी ५०००-६०००, खुडवा गंुटूर ५०००-६०००, गुंटूर १००००-११,०००, तेजा १०,०००-११,०००, लवंगी ८०००-८५००, धने : गावरान ७०००-८०००, इंदूर ८०००-९५००. पोहा : मीडियम २८००-२९००, मध्य प्रदेश ३३००-३४००, पेण पोहे २७००-२८००, दगडी पोहे २९००-३१००, पातळ पोहे ३३००-३५००, सुपर पोहा ३१००-३२००, भाजके पोहे (१२ किलो) ४४०-४७०, मका पोहे (१५ किलो) ४२०-४४०, भाजकी डाळ : ४० किलो : ५५५०-५६५०़ मुरमुरा : ९ किलो : भडंग ७७०-७८०, राजनांदगाव ३५०, सुरती ३७०़, घोटी ३५०. रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) : रवा १२००-१३००, मैदा १२००-१३००, आटा १२००-१३००.बेसन (५० किलो) ६०५०-६३००. नारळ (शेकडा) : नवा नारळ ७५०-८५०, मद्रास १७००-१७५०, पालकोल जुना ९२५- १०००, मिनी मद्रास १३५०-१४००. -------------------