सादरे प्रकरणी आवाज उठविल्याने पोलिसांकडून त्रास
By admin | Published: November 20, 2015 11:54 PM
जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येसंबंधी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाईची मागणी उचलून धरली म्हणून या प्रकरणातील संशयीतांनी धुळे पोलिसांचा वापर करून आपणास त्रास दिला. कुठलाही गुन्हा दाखल नसताना धुळे येथे पोलीस घेऊन गेले. आपल्या घटनात्मक अधिकार्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न धुळे पोलिसांनी केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येसंबंधी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाईची मागणी उचलून धरली म्हणून या प्रकरणातील संशयीतांनी धुळे पोलिसांचा वापर करून आपणास त्रास दिला. कुठलाही गुन्हा दाखल नसताना धुळे येथे पोलीस घेऊन गेले. आपल्या घटनात्मक अधिकार्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न धुळे पोलिसांनी केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. गुप्ता म्हणाले, धुळे, साक्री भागातील काही प्रतिष्ठीतांना माझ्या मोबाईलवरून अश्लील संदेश गेल्याचा आरोप करीत कुठलीही फिर्याद नसताना, या प्रतिष्ठीतांच्या फक्त तोंडी तक्रारींची दखल धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली. माझा मोबाईल होता व त्यात अकोला येथील व्यक्तीचे सीम टाकून हे संदेश पाठविल्याचे धुळे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांनी तेथे चौकशीदरम्यान सांगितले. दोन दिवसांपूर्वी हे संदेश रात्री ११.३० ते १२.३० वाजेदरम्यान पाठविल्याचेही ते म्हणाले. गुरुवारी मला धुळे पोलिसांनी जळगाव शहर पोलिसात नेले. माझा मोबाईल व दोन्ही सीम ताब्यात घेतले. शहर पोलिसांनी मला धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्याची परवानगी दिली व धुळे येथून आलेले चार कर्मचारी व एक उपनिरीक्षक मला धुळे पोलिसात घेऊन गेले. माझ्याविरूद्ध गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी मला ताब्यात घेतले. हा प्रकार माझ्या अधिकारांवर गदा आणणारा आहे. सादरेंना न्याय मिळावा यासाठी मागणी लावून धरल्याने सादरे प्रकरणातील संशयीतांच्या गॉडफादरनी धुळे पोलिसांचा वापर करून माझ्यावर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे, असा आरोपही गुप्ता यांनी केला. सायंकाळी सहा ते पहाटेपर्यंत पोलिसांच्या ताब्यातजळगाव शहरातून धुळे पोलिसांनी मला गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. धुळे येथे माझी चौकशी केली. पहाटे धुळे पोलीस मला घेऊन जळगावात आले व मला पहाटे चार वाजेच्या सुमारास घरी सोडले, असेही गुप्ता म्हणाले. लामकानी दरोड्याची बतावणीमाझी चौकशी लामकानी दरोड्यासंबंधी करण्यात आली, असे मी बाहेर सांगावे. चौकशी या अश्लील संदेशप्रकरणी केली, असे सांगू नये, अशी सूचना पोलिसांनी मला केल्याचेही गुप्ता म्हणाले.