- किरण अग्रवालकोलकाता - एकेकाळी केरळप्रमाणे डाव्यांचा गड म्हणून ओळख जपलेल्या पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत डावे जणू अडगळीत गेल्यासारखेच दिसत आहेत. सध्या तिथे ममतादीदी व नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला असल्याने आपल्याच गडावर लाल बावटा संकोचला आहे.या राज्यात सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत चार टप्प्यात १८ जागांसाठी मतदान झाले. पुढच्या तीन टप्प्यात २४ जागी निवडणूक होईल. पहिल्या चार टप्प्यात जागोजागी गोंधळ, हाणामाऱ्या झाल्या. असनसोलमध्ये केंद्रातील विद्यमान मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तृणमूल कार्यकर्त्यांकडून नासधूस केल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. चौथ्या टप्प्यात इथे तब्बल ७६.४४ टक्के नोंदविला गेला. या राज्यात पूर्वी सत्ता राखताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जे प्रकार अवलंबिले तेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक ते तृणमूल काँग्रेसने अंगीकारलेले दिसतात. सध्या माकपचे २ तर तृणमूलचे ३४ खासदार आहेत.पाचव्या टप्प्यात ८ जागांसाठी मतदान आहे. यासाठी ८३ उमेदवार रिंगणात आहेत. पैकी २३ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, १८ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.देशात मिलावटचे म्हणजे अनेक पक्षांचे सरकार आले तर आठवड्यात प्रत्येक दिवशी एका पक्षाचा पंतप्रधान असेल, त्यात सुट्टीच्या दिवशी फारसे काम नसते त्यामुळे रविवारी ममतांचा नंबर लागेल, अशी खिल्ली भाजप नेते मुकुल राय यांनी उडविली आहे.आरोप-प्रत्यारोपांच्या जुमलेबाजीत विकास गहाणराज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा स्पर्धक म्हणून भाजपकडे पाहिले जाते. डावे पक्ष सातत्याने मागे पडत आहेत. ममता बॅनर्जी मोदी यांचे केंद्रातील सरकार उखडून फेकण्याचा प्रचार करतात तर मोदी यांनी बंगालमधील घुसखोरी व कूप्रशासनावर हल्लाबोल करतात. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची जुमलेबाजी सुरू आहे.- अजय विद्यार्थी(वरिष्ठ पत्रकार), कोलकाताविकासाची चर्चा पडली मागेमाकप व काँग्रेसची अवस्था गेल्या २०१४ च्या निवडणुकीपेक्षाही यंदा बिकट आहे. भाजप पर्याय म्हणून पुढे आल्याने त्याला मतदान वाढू शकते. पण तरीही तृणमूल काँग्रेसच्याच जागा अधिक असतील. काही ठिकाणी मतदारांना मतदानापासून रोखल्याचे आरोप होत आहेत. तृणमूलचा मोदी हटाववर भर आहे. विकासाची चर्चा होताना दिसत नाही.- के. निर्मल(व्यावसायिक), कोलकाता
आपल्याच गडावर लाल बावटा पुरता संकोचला, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचीही दंडेलशाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:40 AM