मुलीच्या अब्रूपेक्षा मताची इज्जत जास्त मोठी - शरद यादवांची मुक्ताफळे
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २५ - विविद मुक्ताफळे उधळून वाद ओढावून घेण्यात आपल्या देशातील अनेक नेते, सेलिब्रिटी पटाईत आहेत. मात्र जनता दलचे (युनायटेड) नेते शरद यादव यांनी अतिशय धक्कदायक आणि खळबळजनक विदान करून नवा वाद ओढावून घेतला आहे. ' बेटी की इज्जत से व्होट की इज्जत बडी है (मुलीच्या अब्रूपेक्षा मताची (व्होट) इज्जत जास्त मोठी असते)' असे अतिशय खळबळजनक विधान यादव यांनी बिहारमधील पाटणा येथील एका सभेत केले.
एवढेच नव्हे तर ' मुलीची अब्रू गेली तर फक्त त्या परिसराची आणि गावाची अब्रू जाते. पण जर एकदा मत विकलं गेलं तर संपूर्ण देशाची बेअब्रू होते आणि स्वप्नही पूर्ण होत नाहीत' अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत.
#WATCH: Senior JDU leader Sharad Yadav says "Beti ki izzat se vote ki izzat badi hai" in Patna (Jan 24th) pic.twitter.com/kvDxZpO2iZ— ANI (@ANI_news) 25 January 2017
Beti ki izat jaygi to gaon&mohalle ki izzat jayegi,vote 1 baar bik gya to desh ki izzat, aur aane wala sapna poora nhi ho skta:Sharad Yadav pic.twitter.com/NUPZi9F6Vg— ANI (@ANI_news) 25 January 2017
Ballot paper ke bare mein bade paimaane pe sab jagah samjhane ki zarurat hai. Beti ki izzat se vote ki izzat badi hai: Sharad Yadav,JDU pic.twitter.com/i6RJw7adDA— ANI (@ANI_news) 25 January 2017