शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

घसरत्या रुपयामुळे यंदा सणांचं 'दिवाळं' निघणार... भेटवस्तू, सुकामेवा महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 10:15 AM

येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण येणार आहेत. यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू महागड्या दरामध्ये बाजारात उतरविल्या आहेत.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणारे रुपयाचे मुल्य, इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब येत्या दिवाळीत उसळणार असून फराळ आणि इतर वस्तू महागणार आहेत. येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण येणार आहेत. यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू महागड्या दरामध्ये बाजारात उतरविल्या आहेत. 

घाऊक बाजारात सणांसाठी लागणाऱ्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल लायटिंग, सुका मेवा, गिफ्ट अशा वस्तूंचा समावेश आहे. डीलर या वस्तू जादा दर लावून किरकोळ बाजारात विकत आहेत. यामुळे ग्राहकांना 20 ते 30 टक्के जादा दराने या वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. यासाठी घसरत चाललेला रुपयाही कारणीभूत आहे. दिवाळीपर्यंत रुपया वधारण्याची चिन्हे दिसत नसल्याने आयातदारही घाबरलेले आहेत. यामुळे वाढलेल्या दरांवरच माल विकत आहेत.

अमेरिकेचे चीनसोबतचे व्यापारयुद्ध आणि एलइडी लाईटचे दर घसरूनही केवळ रुपया घसरत असल्याने चीनमधून 15 ते 20 टक्के जादा दराने मालाचा पुरवठा होत आहे. जुलैपासून आतापर्यंत जवळपास 70 टक्के आयात व्यवहार झाले आहेत. यापैकी अर्ध्या व्यवहारांचे पैसेही देण्यात आले आहेत. चीनचे चलनही डॉलरच्या तुलनेत घसरले असले तरीही भारतीय रुपयाची घसरण जादा असल्याने वस्तू महाग दराने घ्याव्या लागणार आहेत, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.

अरब राष्ट्रांमधून सुकामेवा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही घसरणाऱ्या रुपयामुळे गोची झाली आहे. इंडो-अफगान चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव विकास बंसल यांनी सांगितले की, या वर्षी रुपया 12 टक्क्यांहून जास्त घसरला आहे. भारत सरकारने अमेरिकेच्या सुक्यामेव्यावरही कर वाढविला आहे. अधिकाधिक बदाम हे अमेरिकेतून आयात होतात. तर काजू, पिस्ता आणि इतर पदार्थही आयातीवरच अवलंबून आहेत. यामुळे किंमती वाढल्या आहे. भविष्यात जेवढा रुपया घसरेल तेवढीच महागाई वाढणार आहे. 

सुकामेवा कितीने वाढला?650 ते 800 रुपयांच्या दराने विकला जाणार बदाम 700 ते 1100 रुपये किलोने विकला जात आहे. अमेरिकी आणि इराणी पिस्ता 15 ते 20 टक्क्यांनी वाढून 1100 रुपये किलोवर पोहोचला आहे. चॉकलेट, क्रॉकरी आणि भेटवस्तू सारख्या वस्तूंही रुपयाच्या किंतीवर अवलंबून असल्याने व्यापारी सध्याच्या कमी दराने व्यवहार करत आहेत. या वस्तूंच्या किंमतीही 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 

टॅग्स :DiwaliदिवाळीInflationमहागाईchinaचीनAmericaअमेरिका