शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

‘ती’च्या जिद्दीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून साकारत आहे उपवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:06 AM

देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे.

- कुमार सिद्धार्थइंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे. इंदूर नगरपालिकेच्या मॅराथॉन अभियानामुळे ४० वर्षापासून तयार झालेल्या कचºयाच्या टेकड्यांचे रूप अखेर पालटले आहे. केवळ चार महिन्यात १३ लाख टन दुर्गंधीयुक्त कचºयाचे मोठे ढिगारे आता हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत असून हे स्थान ‘सिटी फॉरेस्ट’ म्हणून विकास पावत आहे. याचे श्रेय जाते ते शहराच्या महापौर मालिनी गौर यांच्या जिद्दीला. त्यांनीच हा संकल्प केला आणि तो पूर्णही करून दाखविला.इंदूर शहराच्या बायपास रोडवर देवगुराडिया क्षेत्रात जवळपास १५० एकरमध्ये पसरलेल्या टेचिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून शहराचा कचरा जमा केला जात होता. दरवर्षी यामध्ये भर पडत तो तब्बल १३ लाख टन होऊन टेकडीचे रुप आले.देवगुराडियाच्या ट्रेचिंग ग्राऊंडवरील ही कचºयाची टेकडी हटविण्यासाठी मागील वर्षी आॅगस्टमध्ये एक निर्धार केला गेला. यासाठी १७ अर्थ मुव्हिंग मशीन भाड्याने आणली गेली आणि आठ-आठ महिन्याच्या शिफ्टमध्ये १५०-१५० मजुरांच्या मदतीने सतत चार महिने अभियान चालविण्यात आले. मशीन्सच्या मदतीने ट्रेंचिंग ग्राऊंडमध्ये साठलेला कचरा पसरविण्यात आला आणि त्यातील हानीकारक तत्त्व नष्ट व्हावे या दृष्टीने त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या १३ लाख टन कचºयातून जवळपास ४ लाख टन प्लास्टिक वेगळे काढण्यात आले. प्लास्टिकसह, गत्ता, चामडे, धातूंचे तुकडे वेगळे करुन भंगारवाल्यांना विकण्यात आले.कचºयाची टेकडी हटताच जवळपास १०० एकर जमीन रिकामी झाली. या जमिनीला समतल करून ९० एकर भूमीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. कचºयाची समस्या सोडविण्यासाठी नियोजित रूपाने सुरू केलेल्या कामामुळे कचºयाची टेकडी आज छोट्या हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत आहे.>दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये समस्यादेशाची राजधानी दिल्लीतच गाजीपूरसह विविध भागात कचºयाच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. गाजीपूर येथील कचºयाची टेकडी ६५ मीटर उंच वाढली असून आणखी ८ मीटर वाढली तर कुतूबमीनारच्या उंचीपर्यंत पोहचेल. दुसरीकडे पंजाबमध्ये गेल्या १० वर्षाच्या प्रयत्नानंतरही कचºयाचे ढिगारे नष्ट करणे शक्य झाले नाही. या ढिगाºयामुळे भूजलही प्रदूषित झाले आहे.