शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! 'असानी' चक्रीवादळामुळे अंदमानच्या काही भागात पाऊस, IMDचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 22:22 IST

असानी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

असानी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाची बेटांच्या दिशेने वेगाने होणारी प्रगती पाहता, आंतर-बेट जहाज सेवेसोबतच, चेन्नई आणि विशाखापट्टणमसह इतर भागांना जाणारी जहाज सेवाही बंद करण्यात आली असून मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बेटांच्या विविध भागात सुमारे 150 NDRF जवान तैनात करण्यात आले आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून सहा मदत शिबिरेही उभारण्यात आली आहेत.

"लोकांनी घाबरू नये, कारण प्रशासन त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व पावलं उचलत आहे", असं आपत्ती व्यवस्थापन सचिव पंकज कुमार म्हणाले. पोर्ट ब्लेअरमध्ये एकूण 68 एनडीआरएफ जवान तैनात करण्यात आले आहेत, तर डिगलीपूर, रंगत आणि हातबे भागात 25-25 जवान तैनात करण्यात आले आहेत. पोर्ट ब्लेअरसह उत्तर आणि मध्य आणि दक्षिण अंदमान जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, असं उत्तर आणि मध्य अंदमानच्या जिल्हा उपायुक्त अंजली सेहरावत यांनी सांगितले. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी चक्रीवादळाबाबत एक ट्विट केलं होतं. कालचे कमी दाबाचे क्षेत्र आज 20 मार्च 2022 रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्राला लागून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आहे. पुढील २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन किमान दाब क्षेत्रात वाढण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली होती. 

चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीकडेही सरकण्याची शक्यताबंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील दाब आज भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता कार-निकोबार (निकोबार बेट) च्या 110 किमी उत्तर आणि वायव्य-पश्चिम मध्यभागी होता. भारतीय वेळेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 वाजता किमान दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारपट्टीकडेही सरकण्याची शक्यता आहे.

शिपिंग सेवा संचालनालयाने 22 मार्चपर्यंत सर्व आंतर-बेट सेवा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय विशाखापट्टणमहून एमव्ही कॅम्पबेल जहाज आणि चेन्नईला जाणाऱ्या एमव्ही सिंधूचा प्रवासही पुढे ढकलण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत.

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगाल