अदानींमुळेच देशात वीज महाग, अब्जावधींचा घोटाळा; राहुल गांधींनी दिला बातमीचा दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:11 PM2023-10-18T12:11:56+5:302023-10-18T12:14:35+5:30
केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत देशात सर्वसामान्य नागरिकांना वीज महाग होण्याच्या पाठिमागे अदानींचा हात आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा देशातील नामवंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौतम अदानी यांना फायदा पोहोचवण्यासाठीच देशातील नागरिकांना वीज महागात मिळत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. राहुल यांनी यापूर्वीही थेट संसदेतून अदानींवर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. अदानी आणि अंबानी हे मोदींचे जवळचे मित्र असल्याचंही ते वारंवार सांगत असतात. आता, पुन्हा एकदा राहुल गांधींनी ३२,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोप लावला आहे. त्यामुळे, अदानी पुन्हा चर्चेत आले आहेत.
केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत देशात सर्वसामान्य नागरिकांना वीज महाग होण्याच्या पाठिमागे अदानींचा हात आहे. तर, अदानींना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकार आणि उद्योगपती अदांनीवर निशाणा साधला. अदानी आणि कोळशाच्या वाढीव दरासंदर्भात त्यांनी फायनेन्शियल टाइम्सच्या बातमीचा दाखला दिला. अदानी हे इंडोनेशियातून कोळशाची खऱेदी करतात आणि तोच कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते, असे राहुल गांधींनी सांगितले.
अडानी जी इंडोनेशिया से कोयला खरीदते हैं और जब वो कोयला हिंदुस्तान पहुंचता है तो उसका दाम बढ़ जाता है।
— Congress (@INCIndia) October 18, 2023
इस तरह से अडानी जी ने करीब 12 हजार करोड़ रुपए सीधे हिंदुस्तान के नागरिकों की जेब से निकाला है।
अडानी ने कोयले के दाम को बढ़ाया, जिससे बिजली महंगी हो गई।
हिंदुस्तान के नागरिकों… pic.twitter.com/4mSIa2iRxR
कोळशाची चुकीची आणि वाढीव किंमत दाखवून अदानींनी भारतीय नागरिकांच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. म्हणूनच देशातील वीजेच्या वाढीव किंमतीच्या पाठिमागे अदानीच आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच, आम्ही लोकांना सबसिडी देत आहोत, पण अदानी किंमत वाढवत आहेत, पण पंतप्रधान गप्प का आहेत? असा सवालही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत विचारला.