शहरं
Join us  
Trending Stories
1
वानखेडेवर भारतीय संघाचं 'ग्रँड सेलिब्रेशन', कोहली-रोहितचं 'इमोशनल स्पीच'! जाणून घ्या, कोण काय बोललं?
2
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
3
Fake T20 World Cup Trophy : व्हिक्ट्री परेडमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीच्या हाती 'डुप्लिकेट' वर्ल्ड कप ट्रॉफी! पण का...? जाणून थक्क व्हाल
4
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
5
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
6
जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
7
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
8
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
9
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
10
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
11
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
12
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
13
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
14
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
15
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
16
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
17
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
18
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
19
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
20
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

दिल्लीत मुसळधार पावसानं विमानतळ टर्मिनल-१ वर लोखंडी छत अंगावर पडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 7:33 AM

पहाटे विमानतळावर वाहतूक अन् गर्दी कमी असल्याने मोठी मनुष्यहानी टळली, मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला. 

नवी दिल्ली : विमानतळाच्या टर्मिनल-१ वर शुक्रवारी छताचा काही भाग कोसळला तेव्हा काहीही तुटल्यासारखा मोठा आवाज आला नाही. मात्र, लोखंडी बीम (छताचा काही भागासह) गाड्यांवर पडल्याने लोकांना घटनेची माहिती मिळाल्याने तेथे गोंधळ उडाला आणि लोक मदतीसाठी आरडाओरड करताना दिसले. अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने ही माहिती दिली.

राष्ट्रीय राजधानीत मुसळधार पावसात शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल-१’ च्या छताचा काही भाग वाहनांवर पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. टर्मिनलच्या ‘पिक-अप’ आणि ‘ड्रॉप’ भागात छताचा काही भाग आणि सपोर्टिंग बीम कोसळल्याने अनेक कारचे नुकसान झाले.

दुसऱ्या कॅब चालकाने सांगितले की, अपघाताच्या वेळी तेथे खूप कमी लोक उपस्थित होते आणि वाहतूक देखील कमी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्युटीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना आणि विमानतळावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.

अनेक रस्ते जलमय, वाहतुकीचा बोजवारागेल्या ८८ वर्षांनंतर जून महिन्यात एका दिवसातला सर्वाधिक पाऊस शुक्रवारी सकाळी कोसळला. त्यामुळे दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले, वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २० ते ३० तासांत दिल्लीत सफदरजंग येथे २२८.१ मिमी पावसाची नोंद झाली. लोधी रोड येथे १९२.८ मिमी, पालम येथे १०६.६ मिमी, आयानगर येथे ६६.३ मिमी पाऊस पडला आहे.  जूनमधील सरासरी ७४.१ मिमी पावसापेक्षा हे तिप्पट प्रमाण आहे. 

खासदारांच्या बंगल्यांतही पाणीदिल्लीच्या पाणीपुरवठा खात्याचे मंत्री रामगोपाल यादव, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले असल्याचे सांगण्यात आले.

सरकारचा दावा फोल : काँग्रेसगेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामात भ्रष्टाचार झाला असल्याची टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर केली. जबलपूर विमानतळाचे कोसळलेले छत, अयोध्येतील नव्या रस्त्यांची दुरवस्था, राममंदिरामधील पाणीगळती, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकरोडला गेलेले तडे, मोरबी पूल कोसळण्याची घटना ही निकृष्ट बांधकामांची काही उदाहरणे आहेत. आम्ही जागतिक दर्जाची बांधकामे केली हा सरकारचा दावा त्यामुळे फोल ठरला आहे, असे खरगे म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीAirportविमानतळRainपाऊस