बलवंत तक्षक -
चंडीगड : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे हिसारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हरयाणाच्या राजकारणातील दोन मोठे दिग्गज देवीलाल आणि भजनलाल हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत, पण यावेळी हिसार मतदारसंघातील इंडियन नॅशनल लोक दलाच्या उमेदवार सुनैना चौटाला यांनी भजनलाल यांचा मुलगा कुलदीप यांची भेट घेऊन मते मागितली आहेत.
- सुनैना चौटाला कुलदीप बिश्नोईंच्या घरी जवळपास तासभर थांबल्या होत्या. या फोटोच्या माध्यमातून बिश्नोई यांनी समर्थकांना सुनैना यांच्या बाजूने मतदान करण्याचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
तिकिटाचे दावेदारसुनैना या माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांची नात आहेत. बिश्नोई हे हिसार मतदारसंघातून भाजपच्या तिकिटाचे दावेदार होते; परंतु पक्षाने ऊर्जामंत्री रणजित सिंह चौटाला यांना तिकीट दिले. तिकीट मिळाल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला होता.
तिकीट न मिळाल्याने नाराजीहिसारमधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने कुलदीप बिश्नोई आणि त्यांचा आमदार मुलगा भव्य बिश्नोई यांना सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान बिश्नोई यांनी कधीही उघडपणे भाजप उमेदवार रणजित सिंह यांची बाजू घेतली नाही. आता इनेलो उमेदवार सुनैना यांच्यासोबतचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. याबाबत बिष्णोई यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीदरम्यान कोणताही उमेदवार घरी जाऊन मतांची मागणी करू शकतो.