ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २५ - हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींना शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन करणा-या रोहितच्या आईला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल संध्याकाळीच रोहितच्या आईच्या छातीत दुखू लागले होते, रात्री त्यांना उपचारांसाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही काळानंतर त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू आप्पाराव पोडिले यांनी रविवारी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. विपीन श्रीवास्तव यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रोहितच्या समर्थकांवर धारावीत हल्ला :
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी जस्टीस फॉर रोहित वेमुला संघटनेमार्फत धारावीत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावर कामराज स्कूलजवळ हल्ला झाला. कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना झालेल्या हल्ल्यात चार तरुणी जबर जखमी झाल्या.
We sent Rohith’s mother to nearest multispeciality hospital. Presently she is in hospital: Dr Ravindra Kumar,CMO UoH pic.twitter.com/q8yDccoW8D— ANI (@ANI_news) January 25, 2016