अहमदाबाद :
‘गाय हा केवळ प्राणी नसून, ती माता आहे. गोहत्या बंद झाल्यास हवामान बदलाविषयीच्या पृथ्वीवरील सर्व समस्या संपतील. गाय दु:खी असेल तर आपले पैसे आणि संपत्ती नष्ट होते,’ असे मत गुजरातमधील तापी जिल्हा न्यायालयाने व्यक्त केले आहे.विज्ञानाने सिद्ध केले आहे की, शेणापासून बनलेली घरे अणू हल्ल्यात सुरक्षित राहतात. त्याचबरोबर अनेक असाध्य रोगांवरही गोमूत्राने उपचार केले जातात, असे निरीक्षण तापी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व्यास यांनी गाय तस्करीच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना नोंदवले.