डुंगरपूर: राजस्थानहून गुजरातला जाणाऱ्या एका कारमधून पोलिसांनी कोट्यवधी रुपये जप्त केले आहे. राजस्थानमधील डुंगरपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डुंगरपूर जिल्ह्यातील बिछिवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका कारमधून ४.५ कोटी रुपये जप्त करण्यात आले. ही रक्कम हवालाशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.हत्या करून पसार झालेल्या दोन आरोपींना अवघ्या २४ तासांत अटकपोलिसांनी जप्त केलेली रक्कम दिल्लीहून गुजरातला पाठवण्यात येत होती असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 'कारमध्ये सापडलेले पैसे जप्त करण्यात आले असून आरोपींची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार ही रक्कम हवाला रॅकेटशी संबंधित आहे. सध्या आरोपींना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांची कारवाई सुरू आहे,' अशी माहिती डीएसपी मनोज सवारिया यांनी दिली.जप्त करण्यात आलेल्या कारमधील नोटांची बंडलं पाहून पोलिसांनादेखील धक्का बसला. पोलीस ठाण्यात इतक्या नोटा मोजण्यासाठी मशीन्स नव्हत्या. त्यामुळे बँकांमधून मशीन्स मागवाव्या लागल्या. सकाळी नोटा मोजण्यात सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत हे काम सुरुच होतं. संध्याकाळी नोटा मोजण्याचं काम थांबवण्यात आलं. आता पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपींकडे असलेली कारदेखील ताब्यात घेतली आहे. त्या कारचं आरटीओ पासिंग दिल्लीचं आहे.
गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडली कोट्यवधींची रोकड; मोजण्यासाठी बँकेतून आणाव्या लागल्या मशीन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 8:40 AM