शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

निवडणूक काळातच विरोधी नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा? तपास यंत्रणा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 1:43 AM

लोकसभा निवडणुका जवळ येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यास केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा प्रकार चालला असल्याचा आरोप होत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जवळ येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यास केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा प्रकार चालला असल्याचा आरोप होत आहे.मुलायम सिंह, अखिलेश, कार्ती चिदम्बरम व तृणमूलचे काही नेते निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचारासाठी वेळ मिळू नये व ते चौकशीत ते अडकून पडावेत, या दृष्टीने केंद्रीय तपास यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप एका काँग्रेस नेत्याने खासगीत केला. केवळ विरोधी नेत्यांना त्रास द्यायचा आणि ज्या सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रयत्न आहे,असा आरोप करताना यानेत्याने भाजपा नेते येडियुरप्पा यांच्यावरील आरोपांचा उल्लेख केला. तो म्हणाला की, येडियुरप्पा यांनी भाजपाच्या नेत्यांना १,८00 कोटी रुपये दिल्याचा आरोप असतानाही त्यांची चौकशी होताना दिसत नाही.अण्णा द्रमुकच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून, पोल्लाची सेक्स स्कँडलमध्ये त्यांच्या नेत्याचे नाव आहे, पण त्याकडे कानाडोळा करून द्रमुकच्या नेत्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावण्यात आले असल्याची तक्रारही या नेत्याने केली.यांना होतोय जाचसमाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव व अखिलेश यादव, बसपाच्या मायावती व त्यांचा माजी सचिव, तृणमूल काँग्रेसचे काही नेते, काँग्रेसचे कर्नाटकातील नेते डी. के. शिवकुमार, द्रमुकचे मारन बंधू, काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना निवडणुकीच्या काळात चौकशीत अडकावून ठेवण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक