कळंबोली : पनवेल महापलिका क्षेत्रात कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल या परिसरात माणुसकीच्या भिंतीची संकल्पना नागरिकांकडून रुजवण्यात आली. त्यानुसार, पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तर कळंबोली एनएमटी बसस्थानकाजवळ या भिंतीचे अनावरण करण्यात आले, परंतु कोरोनामुळे या भिंती ओस पडल्या आहेत. त्या धूळखात पडून आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून या भिंती धूळखात फडून आहेत. तीन महिन्यांपासून अनलॉक झाले, तरी या भिंतीवर कोणत्याही प्रकारे साहित्य मिळत नाही. भिंती अडगळीत पडले आहेत. याकडे दानशूर नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. पावसामुळे भिंती खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी तर कचरासुद्धा साठला आहे. गरजू व गरिबांना आधार देणाऱ्या भिंतीवरली माणुसकी हरवली आहे. कळंबोली एनएममटी बसस्थानकाजवळ या भिंतीवर कित्येक गरीब वस्तू घेऊन जात असत, पण आता तीच भिंत अडगळीत पडली आहे. अनलॉक झाले असले, तरी नागरिकातील मनस्थिती स्थिर राहिली नाही. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे कळंबोली येथील रहिवासी राहुल भोसले यांनी सांगितले. या उपक्रमाला जिवंत ठेवण्यासाठी माणुसकीच्या भिंतीला, माणुसकीचा आधार देणे फारच गरजेचे बनले आहे.महापालिकेने लक्ष देण्याची गरजपनवेल महापालिका, तसेच रोटरी क्लब यांच्या वतीने माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू केला होता. यास प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला. सद्य परिस्थितीत या भिंतीवर बोरी झाडांच्या फांद्यात वाढ झाल्यामुळे फांद्यात भिंत हरवली आहे. हा परिसर, तसेच भिंत सभोवताली साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.