नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने अर्थव्यवस्था नष्ट केलीआहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने येथे महाधिवेशनात केला. नोटाबंदी आणि जीएसटी घाईगडबडीत लागू केल्याने सर्वसामान्य, तरुण, शेतकरी आणि उद्योगांच्या समस्या वाढल्या आहेत. महाधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आर्थिक प्रस्ताव सादर केला.यात म्हटले आहे की, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेत अनेक चुका, चुकीचे व्यवस्थापन दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या कमी झालेल्या किंमती, मजबूत जागतिक आर्थिक विकास आणि लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाल्याच्या ज्या संधी आहेत त्या सरकारने गमावल्या आहेत. अर्थव्यवस्था अज्ञानी आणि अक्षम धोरण आखणाºयांच्या हातात गेली.नोटाबंदीनंतर ना काळा पैसा संपला ना कॅशलेस समाजाचे लक्ष्य गाठता आले. सरकारने देशाची बँकींग प्रणालीच उद्ध्वस्त केला. गत तीन वर्षात ४.५ लाख कोटींचे कॉर्पोरेट कर्ज माफ करण्यात आले. ज्या बँकांमध्ये लोक विश्वासाने पैसा ठेवत होते त्या बँकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी यासारख्या लोकांनी लुटले आहे. सत्ताधाºयांंशी असलेल्या संबंधामुळेच हे लोक पळून जाऊ शकले, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.>चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय हा ‘फार मोठा खोटारडेपणा’ होता व त्याचा शेवट रोजगार नाहिसे होण्यात झाला. सदोष जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार लोकांना दारिद्र्यात ढकलत आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला.
मोदींच्या काळात समस्याच वाढल्या, नोटाबंदीचा निर्णय हा मोठा खोटारडेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:03 AM