आमच्याही काळात झाले होते सर्जिकल स्ट्राइक, काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:51 PM2019-05-02T15:51:48+5:302019-05-02T15:52:50+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे.
नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा हा मोठा मुद्दा ठरला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचा वारंवार उल्लेख केला जात आहे. तर सैन्य दलांच्या पराक्रमावरून सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधक मोदी आणि भाजपावर टीका करत आहेत. दरम्यान, आमच्याही काळात सर्जिकल झाल्या होत्या, असा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच आपल्या सरकारच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादीच काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांवर भाष्य करताना सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख केला होता. ''आमच्या सरकारच्या कार्यकाळात अनेकदा सर्जिकल स्ट्राइक झाल्या. या कारवाया संरक्षण आणि देशविरोधी शक्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्या होत्या. निवडणुकीत मत मिळवण्यासाठी करण्यात आल्या नव्हत्या,'' असा टोला मनमोहन सिंग यांनी या मुलाखतीतून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला होता. त्यानंतर आज काँग्रेसकडून आपल्या सरकारच्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
“हमारे कार्यकाल में कई सर्जिकल स्ट्राइक हुई। हमारे लिए, सैन्य अभियान सामरिक सुरक्षा और भारत विरोधी ताकतों को जवाब देने के लिए थे, न कि वोट बटोरने के लिए"- पूर्व प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंहhttps://t.co/s5779WHhiY
— Congress (@INCIndia) May 2, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकची यादी वाचवून दाखवली. या यादीत एकूण सहा सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करण्यात आला आहे.
या यादीतील सर्जिकल स्ट्राइक पुढील प्रमाणे आहेत.
19 जून 2008 - भटकल पुंज, पुंछ
30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2011 - शारदा सेक्टर, केलमधील नीलम नदीच्या खोऱ्यात
6 जानेवारी 2013 - सावन पत्र चेकपोस्ट
27 आणि 28 जुलै 2013 - नाजपीर सेक्टर
6 ऑगस्ट 2013 - नीलम खोरे
14 जानेवारी 2014 - तत्कालीन लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी 23 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या एका सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला होता.
LIVE: Press briefing by @ShuklaRajiv, former union minister and @NayakRagini, Spokesperson AICC. https://t.co/zyb0a3cLlg
— Congress Live (@INCIndiaLive) May 2, 2019
तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेखही काँग्रेसकडून करण्यात आला. यात 21 जानेवारी 2000 रोजी नदाला एन्क्लेव्ह आणि 18 सप्टेंबर 2003 रोजी बरोह सेक्टर येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करण्यात आला.