देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांच्या मोठ्या प्रमाणात सभा सुरू आहेत. राजकीय नेतेमंडळी देशभरात तासाभरातच इकडून तिकडे जाताना दिसत आहेत. नेतेमंडळी इकडून तिकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टर, चार्टर्ड विमान याचा वापर करत आहेत. नेतेमंडळी निवडणूक काळात एवढी हेलिकॉप्टर आणतात कुठून? त्याच भाडे किती रुपये असतं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.
"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप
आता लोकसभा निवडणुकीसाठी देशात चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरची मागणी ४० टक्क्यांनी वाढली आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, एका विमानासाठी सुमारे ४.५-५.२५ लाख रुपये आणि डबल इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरसाठी सुमारे १.५-१.७ लाख रुपये शुल्क आकारले जातात. तर चार्टर्ड विमानाचे भाडे ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपये प्रति तास असू शकते. म्हणजेच एका मिनिटासाठी आठ हजार रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागते.
निवडणूक काळातच हे भाडेवाढ झाली आहे, निवडणूक नसतात तेव्हा आणि मागील निवडणुकीच्या वर्षांच्या तुलनेत मागणी वाढली असली तरी, पिख्स पंखे असलेली विमाने आणि हेलिकॉप्टरची उपलब्धताही कमी आहे. काही ऑपरेटर इतर कंपन्यांकडून विमाने आणि हेलिकॉप्टर मिळवण्याचा विचार करत आहेत. रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन उदय गेली यांनी पीटीआयला सांगितले की, “निवडणुकीच्या कालावधीत हेलिकॉप्टरची मागणी वाढली आहे आणि सामान्य कालावधीच्या तुलनेत ती २५ टक्क्यांनी जास्त आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे.” सामान्यत: राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना आणि नेत्यांना विविध ठिकाणी, दुर्गम भागात कमी कालावधीत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात. "उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये हेलिकॉप्टरचा अधिक वापर होताना दिसत आहे, असंही गेली म्हणाले.
मागणी ४० टक्क्यांनी वाढली
बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन आरके बाली यांनी पीटीआयला सांगितले की, गेल्या सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा चार्टर्ड विमानांची मागणी ३०-४० टक्क्यांनी जास्त आहे. "सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरसाठी तासाचा दर सुमारे ८०,००० ते ९०,००० रुपये असतो, तर ट्विन-इंजिन हेलिकॉप्टरसाठी तो सुमारे १.५ ते १.७ लाख रुपये असतो," गेली म्हणाले. "निवडणुकीच्या वेळी, सिंगल इंजिन हेलिकॉप्टरसाठी १.५ लाख रुपये आणि ट्विन इंजिनच्या हेलिकॉप्टरसाठी ३.५ लाख रुपयांपर्यंत दर आहेत."
सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात लोक बसू शकतात, तर ट्विन-इंजिन हेलिकॉप्टरमध्ये १२ लोक बसू शकतात. चार्टर्ड विमानाचे भाडे प्रति तास ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपये असू शकते. 'निवडणुकीदरम्यान चार्टर्ड एअर ऑपरेटर्सची कमाई सामान्य वेळेपेक्षा १५-२० टक्क्यांनी जास्त असण्याची शक्यता आहे, असंही कॅप्टन बाली म्हणाले.