नवी दिल्ली : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा मंत्रिपदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून उपचाराची गरज असलेल्या एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले व सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.डॉ. कराड यांची दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मुलाखत आयाेजित केली हाेती. तेथे एका कॅमेरामनला भोवळ आली व ते जमिनीवर कोसळले. डॉ. कराड यांच्या ही बाब लक्षात आल्याबरोबर मंत्रिपद बाजूला ठेवून त्यांनी लगेच या व्यक्तीवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीवर प्रथमोपचार केले. डॉ. भागवत कराड हे प्रथमोपचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर डॉ. कराड यांच्या कृतीचे अनेकांनी कौैतुक केले आहे. यापूर्वी त्यांनी एकदा विमानात एका व्यक्तीवर उपचार केले होते.
भर कार्यक्रमात कॅमेरामनला आली भोवळ, डॉ. भागवत कराड यांनी तातडीने केले उपचार, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 7:50 AM