नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावेळी तेल खरेदी करण्यावरुन झालेला किस्सा सांगितला. 'रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा तेल खरेदी करण्यासाठी विदेशातून दबाव होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावाची पर्वा केली नाही, त्यांनी आम्हाला देशाच्या हिताचे आहे तेच करा असं सांगितले', असं परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर म्हणाले.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. तेल कुठून खरेदी करायचे यासाठी आमच्यावर तेव्हा दबाव होता, पण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने सांगितले जे राष्ट्राच्या हिताचे आहे तेच करायचे. जर दबाव येत असेल तर त्या दबावाचा सामना करु असंही मोदींनी तेव्हा आम्हाला सांगितले होते, असंही एस. जयशंकर म्हणाले.
S. Jaishankar : "... तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही," एस. जयशंकर यांनी अमेरिकेला झापलं
रशिया-यक्रेन युद्धावेळी भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी बोलून काही काळासाठी युद्ध थांबण्याची विनंती केली, असंही एस. जयशंकर म्हणाले.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेसचा दौरा केला. या दौऱ्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. "५२ राजदूत आणि उच्चायुक्तांसह लक्ष्मी विलास पॅलेसला भेट देण्याची आनंददायी संधी मिळाली. त्यांच्यासोबत राजा रविवर्मा चित्रकलेचा संग्रह पाहून मला विशेष आनंद झाला.'', असं ट्विट जयशंकर यांनी केले आहे.
"... तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही,"
अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे संबंध अमेरिकेच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट केले. या संबंधांचा ना पाकला लाभ झाला ना अमेरिकेला, असे ते म्हणाले.
ते येथे भारतीय-अमेरिकी नागरिकांसोबतच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी अमेरिकेने एफ-१६ लढाऊ विमानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पाकला पॅकेज दिल्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही रोखठोक भूमिका मांडली. पाकला पॅकेज दिल्यावरून भारतात अमेरिकेवर टीका झाली होती. तेव्हा पाकला आर्थिक साहाय्य केले नसून, एफ-१६ विमानांच्या सुट्या भागांची विक्री केली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे करण्यात आले, असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले होते.