ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - आंतरराष्ट्रीय टी-२० वर्ल्डकपच्या दरम्यान चॅम्पियन...चॅम्पियन... या आपल्या गाण्याने अनेकांना वेड लावणारा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो आता बॉलिवूडमधील एका चित्रपटासाठी गाणार आहे.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो बॉलिवूडमधील 'तुम बिन - २' या आगामी चित्रपटासाठी गाणार आहे. ड्वेन ब्राव्हो याच्यासोबतच संगितकार अंकित तिवारी सुद्धा त्याला साद देणार आहे. 'तुम बिन - २' या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करणार आहेत.
दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोमानियाच्या एका नाईटक्लबमध्ये ड्वेन ब्राव्होच्या गाण्याचे शुट करण्यात येणार आहे. यात ड्वेन ब्राव्हो पूर्णपणे इंडो-वेस्टर्नच्या पोशाखात असणार असून तो हिंदीतून गाणे गाणार आहे. तसेच, ड्वेन ब्राव्होसोबत चित्रपटातील अभिनेत्री नेहा शर्मा, अशिम गुलाटी आणि अदित्य सेएल सुद्धा दिसणार आहेत.
बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस अनेक बाहेरचे कलाकार दिसून येत आहेत. २०११ मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या 'रावन' या चित्रपटातील छम्मक छल्लो हे गाणे अमेरिकन रॅपर अकॉन याने गायले होते.
India! I'm coming "home" soon. Excited to debut in Tum Bin 2 with @anubhavsinha Stay tuned!— Dwayne DJ Bravo (@DJBravo47) August 25, 2016
Can't wait...:-) let's make 'em dance some... https://t.co/VabHXUSRzn— Anubhav Sinha (@anubhavsinha) August 25, 2016