'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 08:40 PM2023-08-20T20:40:20+5:302023-08-20T20:41:31+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस, डीएमके आणि शिवसेना(उद्धव ठाकरे) गटावर निशाणा साधला.

'Dynastic politics is poison', Amit Shah criticizes Shiv Sena along with Congress, DMK | 'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका

'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका

googlenewsNext

भोपाल- निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संध सोडत नाहीयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा काँग्रेससह अनेक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करतात. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) वर घराणेशाहीचा आरोप केला. 

घराणेशाही विष
अमित शहा मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेला असता, यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. घराणेशाहीचे राजकारण हे 'विष' असल्याचे वर्णन करताना अमित शहा म्हणाले की, या व्यवस्थेत पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाखालील सरकारचे नियंत्रण फक्त एकाच कुटुंबाच्या हातात राहते. मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये जातीवादाचे विष पसरवण्यासाठी 2015 पासून काँग्रेसने जाती आधारित आंदोलने पुरस्कृत केल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पक्षांवर सडकून टीका
एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मला कोणत्याही नेत्याचे नाव घ्यायचे नाही, परंतु काँग्रेस, सपा, द्रमुक, शिवसेना (यूबीटी) यांचे घराणेशाहीचे राजकारण म्हणजे, पक्षात एकच कुटुंब आहे आणि सरकारही त्यांचेच. यालाच घराणेशाही म्हणतात. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांना तिकीट दिल्याचा बचाव करत अमित शाह म्हणाले, गुणवत्तेच्या आधारेच तिकीट दिले आहे. घराणेशाही विष आहे. पक्ष एकाच कुटुंबापुरता मर्यादित राहिल्यास तळागाळातून येणाऱ्यांना काय स्थान असेल? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

भाजपमध्ये घराणेशाही नाही
शहा पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. मी पक्षाचा अध्यक्ष झालो, माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. शिवराजसिंह चौहान यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. काँग्रेसचा अजेंडा समजून घ्या. पक्ष आणि सत्तेवर एकाच कुटुंबाचे वर्चस्व, यालाच घराणेशाही म्हणतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: 'Dynastic politics is poison', Amit Shah criticizes Shiv Sena along with Congress, DMK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.