नवी दिल्ली : जर तुम्ही नव्या पासपार्टसाठी अर्ज केला किंवा तुम्हाला २०२१ मध्ये पासपोर्ट पुन्हा हवा आहे तर तुम्हाला कदाचित ई-पासपोर्टच मिळू शकेल. त्यात बसवलेली असेल इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप. चाचणी म्हणून अशा चिप्स असलेले २० हजार अधिकृत आणि राजनैतिक ई-पासपोर्टस दिल्यानंतर सरकारने आता सगळ्या नागरिकांना ई-पासपोर्टस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि हा मोठा प्रकल्प राबवण्यासाठीचा उपाय सांगेल आणि माहिती तंत्रज्ञान मूलभूत सुविधा उभी करेल अशा संस्थेची निवड सरकार करत आहे. परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करत असलेल्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने आयटी इन्फ्रास्ट्रक्टर उभे करणे आणि ई-पर्सनायलेझशन ऑफ पासपोर्टसवर उपाय शोधण्यासाठी बुधवारी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जारी केले.अधिक सुरक्षितया नव्या तंत्रज्ञानामुळे बनावट पासपोर्ट बनवणे कठीण बनेल. आतापर्यंत नागरिकांना दिले गेलेले पासपोर्टस हे बुकलेटसवर छापलेले व पर्सनालाईजड आहेत. दर तासाला १० ते २० हजार पर्सनालाईजड ई पासपोर्ट देऊ शकेल व त्याची प्रक्रिया राबवू शकेल, असे केंद्रच संस्था स्थापन करेल. आयटी सिस्टिम्स दिल्ली आणि चेन्नईत हा भार हाताळण्यासाठी उभ्या केल्या जातील.
ई-पासपोर्ट नागरिकांना देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:36 AM